spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आणि हे मराठी कलाकार…,टीका करणाऱ्या नेटकऱ्याला हेमांगी कवीने दिले सडेतोड उत्तर

हेमांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.कधी आपले फोटो शेअर करत असते तर कधी तिला ट्रोल देखील केलं जातं.पण प्रत्येक वेळी हेमांगी टीका करणाऱ्या नेटकऱ्याला रोखटोक बोलताना दिसून आली आहे.

मराठी सिनेसृष्टीताल अभिनेत्री हेमांगी कवी ही नेहमीच कोणत्यानं कोणत्या कारणानं चर्चेत येत असते, दरम्यान हेमांगी कवीने आपल्या अभिनयाच्या शैलीतून सिनेसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला आहे.नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज अशा सगळ्या माध्यमांमध्ये तिने काम केलेलं आहे. अभियाबरोबरच ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. हेमांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.कधी आपले फोटो शेअर करत असते तर कधी तिला ट्रोल देखील केलं जातं.पण प्रत्येक वेळी हेमांगी टीका करणाऱ्या नेटकऱ्याला रोखटोक बोलताना दिसून आली आहे.

 दरम्यान हेमांगीने दिवाळीनिमित्त नुकतेच तिच्या कुटुंबीयांबरोबरचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना हेमांगीने तिच्या शैलीत कॅप्शन दिलं आहे.हेमांगी कवीने दिवाळीनिमित्त तिच्या नवऱ्याबरोबर फोटो शेअर करत याला “मी तुझी लक्ष्मी तू माझ्याकडेच पहा, होणारे मीच प्रसन्न ऐक सल्ला हा महा! बाकी तुमच्यावरही लक्ष्मी प्रसन्न होवो ह्याच शुभेच्छा! #लक्ष्मीपूजन” असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्रीचं हे कॅप्शन वाचून एका नेटकऱ्याने तिच्या वाक्यरचनेतील चूक काढत अभिनेत्रीवर टीका केली. “होणारे नाही हो होणार आहे…. आणि हे मराठी कलाकार…” अशी टीकात्मक कमेंट या संबंधित युजरने अभिनेत्रीच्या फोटोवर केली आहे.

आता हेमांगीने यावर सडेतोड उत्तर देत आपली बाजू स्पष्ट केली आहे. अभिनेत्री लिहिते, “बाकी कॅप्शन व्यवस्थित लिहिलंय ते दिसत नाही. म्हणजे किती नकारात्मक असावं नाही का एखाद्याने! मोठ्या शुभ्र पांढऱ्या कॅनव्हासवर सूक्ष्म काळा ठिपका बघणा’रे’ हे लोक! च च च!” अभिनेत्रीच्या चाहत्यांनी देखील या टीका करणाऱ्या युजरची कमेंट सेक्शनमध्ये चांगलीच शाळा घेतली आहे.

दरम्यान, हेमांगीने अलीकडेच ती रवी जाधव यांच्या ‘ताली’ सीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय अभिनेत्रीने बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एका जाहिरातीमध्ये काम केलं आहे.दरम्यान हेमांगी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते,ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असते,तर तिचे चाहते देखील तिच्या पोस्टला पसंती देत असतात.

Latest Posts

Don't Miss