spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

EXCLUSIVE -अभिनेत्री मानसी नाईकसोबत दुर्गोत्सव निमित्त खास गप्पा

दुर्गोत्सव या कार्यक्रमात पहिल्या दिवशी अभिनेत्री आणि नृत्यंगणा मानसी नाईक सहभागी झाली आणि तिने आमच्या सोबत खुप गप्पा मारल्या आणि मंडळाला भेट दिली.

शारदीय नवरात्री उत्सवाला आज पासुन सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेची नऊ वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवरात्रीची सुरुवात होते. यावेळी शारदीय नवरात्री १५ ऑक्टोबरपासून सुरू होत असून २४ ऑक्टोबरला संपणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.देवीची स्थापना करुन पुजा केली जाते.

यावेळी असणारा नवरात्र उत्सव खास असणार आहे,कारण टाईम महाराष्ट्र घेऊन येत आहे,’दुर्गोत्सव’ हा विशेष कार्यक्रम, या कार्यक्रमात आपण नऊ दिवस नऊ मंडळात जाऊन नऊ अभिनेत्रींशी गप्पा मारणार आहोत,त्यांच्या नवरात्री विषयीच्या आठवणी आणि अनुभव जाणुन घेणार आहोत

तर दुर्गोत्सव या कार्यक्रमात पहिल्या दिवशी अभिनेत्री आणि नृत्यंगणा मानसी नाईक सहभागी झाली आणि तिने आमच्या सोबत खुप गप्पा मारल्या आणि मंडळाला भेट दिली.मानसीने कणखर पणे आपली मत या नवरात्री विशेष मुलाखतीत मांडले.

यावेळी मानसी म्हणली तिला नवरात्री हा सण साजरा करायला खुप आवडतो,विशेष म्हणजे मानसी मुळची पुण्याची असल्याने तिच्या पुण्याच्या घरी देवीचे घट बसवले जातात आणि पारंपारिकदृष्ट्या सण साजरा करायला मला खुप आवडत, म्हणजे अगदीच संपुर्ण नैवेद्य त्यात भात,आमटी,कुरडया,पुरणपोळ्या असा सागरसंगीत नैवेद्य घरी बनवला जातो,असे मानसीने यावेळी सांगितले.

याचदरम्यान माझ्या आईमध्ये मला दैवी शक्ती जाणवते,कारण माझ्या प्रत्येक अडचणीत ती सतत माझ्यासोबत असते,याचबरोबर मला नवरात्रीत नऊ रंगांचे कपडे परिधान करायला देखील आवडते, असं देखील तिने यावेळी सांगितले आहे.तसचं मला साडी नेसायला कारणचं हवं असं ही वाटत नाही कारण मला साडी नेसायला खुप आवडत.आजकाल महिला या सगळ्य़ाच क्षेत्रात पुढे आहेत आणि त्यांनी तसचं पुढे जावं कधीच हार मानु नये,शेवटपर्यत प्रयत्न करावे यश हे नक्की तुमच्या पर्यंत येणारचं असा मोलाचा सल्ला देखील मानसीने यावेळी सगळ्या महिलांना दिला आहे.

दरम्यान सोशल मीडियवार ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांन ही मानसीने सडेताड उत्तर दिलं आहे.आणि लवकरच मानसी बॉलीवूडमध्ये दिसून येणार असल्याची घोषणा तिने टाईम महाराष्ट्रला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

दुर्गोत्सव या कार्यक्रमात मानसीची उर्जा प्रचंड होती,तिचा मंडळात असलेला वावर देखील कौतुक करावा असाचं होता.

हे ही वाचा: 

यंदाच्या नवरात्रीत बनवा पौष्टिक उपवासाच्या पुऱ्या, जाणून घ्या रेसिपी.

लवकरच भारतात जगातील सर्वात मोठं जहाज पोहोचणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss