spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटात दिसणार नम्रता संभेरावचा पती, नम्रतासाठी यंदाचा पाडवा खास

'एकदा येऊन तर बघा’ चित्रपटात दिसणार नम्रता संभेरावचा पती, नम्रतासाठी यंदाचा पाडवा खास असणार आहे.

‘एकदा येऊन तर बघा’ या  मराठी  चित्रपटाची रसिक प्रेक्षक  गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. १४ विनोदवीर एकत्र आणत दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी विनोदाची जबरदस्त मेजवानी रसिकांसाठी आणली आहे.  हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता ,पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. ‘एकदा येऊन तर बघा ’ आता २४ नोव्हेंबर ऐवजी  ८ डिसेंबरला  तुमच्या भेटीला येणार आहे .

दरवर्षी दिवाळी पाडवा म्हटलं की नवऱ्यांना प्रश्न पडत असतो की,बायकोला काय गिफ्ट द्याव, याची विशेष चर्चा होत असते. मात्र यंदा अभिनेत्री नम्रता संभेरावला तिच्या नवऱ्याने एक खास गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे नम्रता सध्या चांगलीच खुश झाली आहे.आणि यंदाचा पाडवा तिच्यासाठी खास ठरणार आहे.नम्रता संभेरावसाठी यंदाचा पाडवा विशेष ठरणार आहे. येत्या ८ डिसेंबरला नम्रताचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात नम्रता संभेरावचे पती योगेश संभेराव एका छोटेखानी भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.विशेष म्हणजे रील लाईफमध्येही हे कपल एकत्र झळकणार असल्याने रिअल टू रील हा प्रवास नम्रताला विशेष आनंद देणारा आहे यात शंका नाही. तसेच यानिमित्ताने तिचा पाडवाही आनंदात साजरा होणार आहे.

‘एकदा येऊन तर बघा’ या  मराठी  चित्रपटाची रसिक प्रेक्षक  गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. १४ विनोदवीर एकत्र आणत दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी विनोदाची जबरदस्त मेजवानी रसिकांसाठी आणली आहे.  हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता ,पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. ‘एकदा येऊन तर बघा ’ आता २४ नोव्हेंबर ऐवजी  ८ डिसेंबरला  तुमच्या भेटीला येणार आहे .

दरम्यान येत्या ८ डिसेंबरला प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक कृष्ण चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची आहे. तर सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी,डॉ.झारा खादर यांची आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, भाऊ कदम,विशाखा सुभेदार,गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव,ओंकार भोजने राजेंद्र शिसातकर वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने,सुशील इनामदार इत्यादी कलाकार झळकणार आहेत.

हे ही वाचा : 

पाडव्यानिमित्त शरद पवारांच्या भेटीगाठी

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरने दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली पहिली गाडी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss