spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, ‘या’ तारेखला होणार प्रदर्शित

‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसाद खांडेकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसाद खांडेकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. १४ विनोदवीरांना एकत्र आणून दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी विनोदाची जबरदस्त मेजवानी रसिकांसाठी आणली आहे.

दरम्यान हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता ,पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ‘एकदा येऊन तर बघा ’ आता २४ नोव्हेंबर ऐवजी ८ डिसेंबरला  तुमच्या भेटीला येणार आहे. आता प्रेक्षकांना या चित्रपटाची मेजवानी ८ डिसेंबरला चित्रपटगृहात जाऊन घेता येईल.

दिवाळीमध्ये चित्रपटगृहांमधील  हिंदी-मराठी  चित्रपटांची वाढलेली गर्दी लक्षात घेता दोन आठवडे थांबून ८  डिसेंबरला  चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाच्या टीमने घेतला आहे.या चित्रपटाचा टीझर, गाणी या सर्वांनीच लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटातील ‘आली आली गं भागाबाई’ या गाण्यानं प्रेक्षकांना थिरकायला लावलं आहे.या चित्रपटात विशाखा सुभेदारबरोबर गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार, यांसारखी दिग्गज स्टारकास्ट दिसणार आहे. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.

‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट कौटुंबिक चित्रपट आहे. यात गिरीश कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंबीय एका नव्याकोऱ्या हॉटेलची सुरूवात करतात. या नव्या हॉटेलमध्ये विविध अतरंगी पाहुण्याची एन्ट्री होते आणि त्यानंतर मग गोष्टी कशा बदलतात याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

एकदा येऊन तर बघा हा चित्रपट शुक्रवारी २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणात्सव या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता येत्या ८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटात तब्बल १४ विनोदवीर भूमिका साकारणार आहेत. यात सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, भाऊ कदम, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव,   पॅडी कांबळे, राजेंद्र शिसटकर, वनिता खरात, रोहित माने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, जय चौबे, राकेश शालिन यांचा समावेश आहे. दरम्यान लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे.

हे ही वाचा : 

Tulsi Vivah 2023, तुलसी आणि विष्णूचे लग्न का झाले? जाणून घ्या सविस्तर…

आणि हे मराठी कलाकार…,टीका करणाऱ्या नेटकऱ्याला हेमांगी कवीने दिले सडेतोड उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss