“काशीला जायच्या वयात.. ” डान्सच्या व्हिडिओवरुन ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना  ऐश्वर्या नारकरांनी दिलं सडेतोड उत्तर

मराठी चित्रपटसृष्टीतील ऐश्वर्या नारकर या लोकप्रिय अभिनेत्री आहेत.त्याने गेले अनेक वर्ष प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाच्या शैलीतून खिळवत ठेवलं आहे.

“काशीला जायच्या वयात.. ” डान्सच्या व्हिडिओवरुन ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना  ऐश्वर्या नारकरांनी दिलं सडेतोड उत्तर

मराठी चित्रपटसृष्टीतील ऐश्वर्या नारकर या लोकप्रिय अभिनेत्री आहेत.त्याने गेले अनेक वर्ष प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाच्या शैलीतून खिळवत ठेवलं आहे.सध्या छोट्या पडद्यावरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत त्या काम करत आहेत.या मालिकेत जरी त्या खलनायिकेचं काम करत असल्या तरी प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजवलं आहे.दरम्यान सिनेसृष्टीत लोकप्रिय कपल म्हणुन ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांना ओळखले जाते. दोघांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऐश्वर्या आणि अविनाश दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. निरनिराळे रील आणि फोटो ते शेअर करताना दिसतात. अनेकदा या व्हिडीओवरून नेटकरी त्यांना ट्रोलही करतात.आणि ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना ऐश्वर्या वेळोवेळी खडसावत देखील असतात.  दरम्यान, ऐश्वर्या नारकर पुन्हा एका नव्या व्हिडीओमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत.

ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर डान्सचा व्हिडओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या एका कार्यक्रमासाठी डान्सचा सराव करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत ऐश्वर्या नारकर यांनी लिहिलं, “डान्स हा खऱा स्ट्रगल आहे.” ऐश्वर्या यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. एका युजरने कमेंट करत ऐश्वर्या नारकर यांना “आजी देव देव करा” असा सल्ला दिला आहे. या युजरला ऐश्वर्या नारकर यांनी “अरे बाळा, तुझ्या देवाने तुला सद्बुद्धी नाही का दिली?” असं म्हणत चांगलंच सुनावलं आहे. तर आणखी एका युजरने “ऐश्वर्या नारकर गैरहजर असतील देव सदबुद्धी वाटताना” अशी कमेंट केली आहे. तर तिसऱ्याने कमेंट करत “काशीला जायच्या वयात डान्स करणारी आज्जी. आज्जी जोमात बाकी सगळे कोमात”, असं लिहिलं आहे.”

दरम्यान, या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी ऐश्वर्या नारकर यांच्या डान्सचं कौतुक करत व्हिडिओवर लाईक केला आहे.तर काहींनी या व्हिडीओवर अप्रतिम, सुंदर अशी कमेंट केली आहे.मात्र ट्रोल करणाऱ्या युजर्सना ऐश्वर्या नारकर यांनी सडेतोड उत्तर देखील दिलं आहे.

हे ही वाचा:

MMRDA बैठकीत खासदार DR. SHRIKANT SHINDE यांच्या मागणीला यश

MAHARASHTRA: IRCTC वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांना मनस्ताप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version