मेहंदी रचली गं ; स्वानंदी-आशिषची लगीनसराई,मेहंदीचे फोटो आले समोर

सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नाची लगबग सुरु आहे.या महिन्यात अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे,

मेहंदी रचली गं ; स्वानंदी-आशिषची लगीनसराई,मेहंदीचे फोटो आले समोर

सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नाची लगबग सुरु आहे.या महिन्यात अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे,अभिनेत्री सुरुची आडरकरने पियुष रानडे सोबत लग्नगाठ बांधली तर आताच नुकतच  काही दिवसांपुर्वी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन लग्नगाठ बांधली आहे. तर दुसरीकडे मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे तिचा बॉयफ्रेंड स्वानंद तेंडूलकर सोबत लग्न करणार आहे.त्यांच्या लग्नाच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. त्यांच्या मेंहदीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.तर आता आणखी एक कपल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी आता लवकरच लग्न करणार आहेत.काही दिवसांपुर्वीचं स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा पार पडला.

स्वानंदी आणि आशिषच्या लग्नाची आता सर्वांना उत्सुकता होतीच. अशातच स्वानंदी – आशिष कुलकर्णीच्या घरी लगीनाची लगबग सुरु झालीय.नुकताच या जोडप्याचा मेंहदी सोहळा पार पडला आहे. स्वानंदी – आशिष कुलकर्णी यांनी नुकतेच तिच्या सोशल मीडियावर मेहंदीचे फोटो शेअर केलेत. ‘ही #ANANDI मेहंदी’ असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.स्वानंदी-आशिष या दोघांच्या नावाचा आनंदी हा हॅशटॅग तिनं तयार केला आहे. आशिष – स्वानंदीच्या मेंहदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. नेटकरी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.या फोटोत मेहंदी सोहळ्यासाठी त्यांनी खास लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे,त्यात आजुबाजुला खास फुलांची आकर्षक सजावट केली होती. तर बोर्डवर ‘वेलकम टू स्वानंदीची मेहंदी…’ असं लिहिण्यात आल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांच्या घरी आता लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. आज स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा हळद सोहळा असणार आहे,. तर हे दोघे 25 डिसेंबरला लग्नबेडीत अडकणार आहे.आशिष कुलकर्षी हा गायक – संगीतकार आहे. तो इंडीयन आयडॉल 12 व्या सीझनमध्ये सहभागी होता. आशिष कुलकर्णी स्वत:चे लाईव्ह शोज सुद्धा करतो.आशिष आणि स्वानंदी बऱ्याच दिवसापासून एकमेकांना डेट करत होते. आता दोघेही लग्न करणार असल्याने त्याचे चाहते खुप उत्सुक आहेत. स्वानंदी-आशिषला चाहते कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.आता लवकरच हे दोघं आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत.

हे ही वाचा:

मनोज जरांगे यांनी सांगितला मुंबईत उपोषणाला येण्याचा प्लॅन

Anil Kapoor birthday  : सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अनिलजी यांचा बॉलीवूड प्रवास जाणुन घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version