spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दिग्दर्शक रवी जाधव यांनी खरेदी केली इकोफ्रेंडली गाडी

नुकतीच रवी जाधव यांनी नवीकोरी इकोफ्रेंडली गाडी खरेदी केली आहे. नवी आलिशान गाडी खरेदी करतानाचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे

मराठी सिनेसृष्टीतील कलाकार म्हणा किंवा दिग्दर्शक ,निर्माते या सगळ्यानी आपल्या अभिनयची छटा प्रेक्षकांपर्यत अगदी मोठ्या प्रमाणात पोहचवली आहे.अनेक मराठी कलाकारांनी मराठीसह बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे.दरम्यान दिग्दर्शक रवी जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीला जबरदस्त असे मराठी चित्रपट दिले, आजच्या तरुणाईला भावणारे आणि आवडणाऱ्या विषयावर चित्रपट बनवण्यावर विशेष भर त्यांनी घातली.मराठी सिनेसृष्टीत त्यांनी आपला डंका गाजवलाचं मात्र आता रवी जाधव यांनी हिंदी कलाविश्वात देखील नाव कमावले आहे.तर नुकत्याच प्रदर्शिच करण्यात आलेल्या ‘ताली’ सीरिजला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

दिग्दर्शक रवी जाधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच त्यांच्या दैनंदिन आणि व्यावसायिक जीवनाची प्रत्येक अपडेट ते इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. नुकतीच रवी जाधव यांनी नवीकोरी इकोफ्रेंडली गाडी खरेदी केली आहे. नवी आलिशान गाडी खरेदी करतानाचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.तर रवी जाधव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या पत्नी मेघना जाधव देखील पाहायला मिळत आहेत. “आमच्या कुटुंबात नवीन आलिशान इकोफ्रेंडली गाडी दाखल झाली आहे” असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिलं आहे. रवी जाधव सपत्नीक या व्हिडीओमध्ये नव्या गाडीचं ओपनिंग करत आहेत.आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ही आपल्याला पाहायला मिळत आहे.

रवी जाधव यांनी खरेदी केलेली गाडी पांढऱ्या रंगाची असून या कारचं नाव टोयोटा हायक्रॉस ZX(O) असं आहे. रवी जाधव यांनी गाडीचं नाव कॅप्शनमध्ये सांगितले आहे या गाडीची ऑनलाइन किंमत ३० लाख अधिक टॅक्स म्हणजेच जवळपास ३५ लाख २८ हजारांच्या आसपास आहे. दरम्यान, रवी जाधव यांनी नवीन गाडी घेतल्याने नेटकऱ्यांनी आणि कलाविश्वातील कलाकारांनी देखील जाधव कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान दिग्दर्शक रवी जाधव हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असल्यामुळे,त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे, आणि त्यामुळे रवी जाधव यांच्या आगामी चित्रपटांची त्यांचा चाहता वर्ग नेहमीचं आतुरतेने वाट बघत असतो.

हे ही वाचा : 

प्रभासने डिलीट केले सोशल मीडिया अकाउंट चर्चांना उधाण

बिग बॉस १७ प्रेक्षकांच्या भेटीला,१७ स्पर्धक सहभागी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

 

Latest Posts

Don't Miss