spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेची स्ट्रगल स्टोरी,बालपणीतल्या कष्टांच्या दिवसांना उजाळा

छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा लोकप्रिय कॉमेडी कार्यक्रम आहे.या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देतात.

छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा लोकप्रिय कॉमेडी कार्यक्रम आहे.या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देतात.दरम्यान या कलाकारांनी देखील आपल्या विनोदाच्या कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे.हास्यजत्रेतला सध्याचा अवल्ली कलाकार म्हणजे महाराष्ट्राचा लाडका गौरव मोरे चांगलाच चर्चेत आह.हास्यजत्रेच्या कार्यक्रमातून गौरव घराघरात पोहचला.दरम्यान सध्याच्या घडीला गौरव मोरे  हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. फिल्टर पाड्याचा बच्चन या नावाने विशेष त्याला ओळखलं जात.त्याने आपल्या विनोदाच्या जोरावर छोट्या पडद्यासह रुपेरी पडदाही गाजवला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहचलेल्या गौरवने खऱ्या आयुष्यात बराच स्ट्रगल केला आहे. अगदी ताडपत्रीच्या घरात राहून त्याने दिवस काढले आहेत.

अलिकडेच गौरवने  एका मुलाखतीत त्त्याची स्ट्रगल स्टोरी सांगितली. विशेष म्हणजे गौरवचा प्रवास खुपच खडतर असा आहे,ते म्हणतात ना शुन्यातून विश्व निर्माण केलं आहे,अगदी तसाच कठीण प्रवास करत गौरव आता नावारुपाला आला हे. उल्हासनगर मग कल्याण अशा शहरांमध्ये त्याच बालपण गेलं. परंतु, बालपणीही त्याने आणि त्याच्या कुटुंबाने बरेच कष्ट उपसले.गौरवने त्याची स्ट्रगल स्टोरी सांगितसी आहे.”आम्ही सगळ्यात आधी सुरुवातीला उल्हासनगरमध्ये रहायचो. स्टेशनच्या बाजूला ताडपत्री असलेल्या घरात आम्ही रहायचो. त्यानंतर मग विठ्ठलवाडीला स्टेशनच्या बाजूला रहायला गेलो. पण, तिथे मला त्रास होऊ लागला असं माझी आई सांगते. त्यामुळे मग ती जागाही आम्ही सोडली. त्यानंतर मग कल्याणला आम्ही शिफ्ट झालो. त्याच दरम्यान वडिलांची बदली भांडुपला झाली. तेव्हा आम्ही फिल्टरपाड्याला शिफ्ट झालो. पण तिथेही ताडपत्रीचंच घर होतं. ताडपत्री म्हणजे ताडाच्या झाडाचं लाकूड वापरुन ही घरं तयार केली जायची. पण, पावसाळ्यात फार हाल व्हायचे. पाऊस पडला की आमच्या घरात एक जण पाणी साचू नये म्हणून जागा रहायचा. एक जण घरात टोप लावून बसायचा”, असं गौरव म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “सुरुवातीला माझ्या रंगामुळे आणि उंचीमुळे मला फार कॉम्प्लेक्स यायचा. पण, शाळेत गेल्यानंतर आठवीमध्ये मी थोडा सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागायला लागलो. अनेकांच्या मिमिक्री करायचो. एकदा मी लहान असताना शेजारी टीव्ही पाहायला गेलो होतो पण त्यांनी मला घरातून बाहेर हकललं. ही गोष्ट माझ्या आईने पाहिली आणि तू तिकडे का गेलास असं विचारत मारायला सुरुवात केली. त्या काळात टीव्ही घेणं फार मोठी गोष्ट होती. त्यावेळी परिस्थितीचं गांभीर्य नसल्यामुळे ४-५ दिवस टीव्हीसाठी रडत होतो.”दरम्यान, “एक दिवस शाळेच्या मधल्या सुट्टीत माझ्या बहिणीने मला घरी टीव्ही आणल्याचं सांगितलं. त्यावेळी कधी एकदा ५.३० वाजतायेत आणि मी घरी जातोय असं मला झालं होतं. तेव्हा मला टीव्हीचा रिमोर्ट हातात घ्यायची फार इच्छा होती. शाळेतून घरी गेल्यावर मी पहाटे ४ वाजेपर्यंत टीव्ही पाहत होतो. लहानपणी तुम्ही जे शिकता, जे तुमच्या मनात साचतं ते आयुष्यभर तसंच राहतं. आपले आई-बाबा मेहनत करतात ती परिस्थिती आपण सुधारायची हे मी आधीपासूनचं ठरवलं होतं.”

दरम्यान, महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून नावारुपाला आलेला गौरव मोरे ‘लंडन मिसळ’ या सिनेमाच्या माध्यमातून गौरवने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे.आताच्या घडीला गौरव मोरे हे नाव खुप प्रसिद्ध आहे त्याने केलेल्या प्रत्येक कष्टाचे,मेहनतीचे फळ त्याला मिळत आहे.गौरवचा चाहता वर्ग देखील बराच मोठा असल्याने चाहते देखील त्याच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेना वाट पाहत असतात.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss