‘आमचं झालंय’, लग्नानंतर मुग्धा- प्रथमेशने शेअर केली खास पोस्ट

छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे घराघरात पोहचले.या दोघांनाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं.

‘आमचं झालंय’, लग्नानंतर मुग्धा- प्रथमेशने शेअर केली खास पोस्ट

छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे घराघरात पोहचले.या दोघांनाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं.सारेगमपच्या मंचावर प्रथमेशला उकडीचा मोदक तर मुग्धाला लिटील मॉनिटर अशी ओळख मिळाली.दरम्यान सारेगमपच्या मंचावर जुळलेले सुर खऱ्या आयुष्यात देखील तंतोतंत जुळले,अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी २१ डिसेंबरला चिपळूण येथे थाटामाटात लग्न केलं.दोघंही आता आयुष्यभराचे साथीदार झाले आहेत. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला जवळचे नातेवाईक आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला.दरम्यान या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक गायक व कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नसोहळ्यातील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गेले अनेक दिवसांपासुन मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाची लगबग सुरु होती.तर लग्न होईपर्यंतच्या सगळ्या विधींचे फोटो मुग्धा-प्रथमेशने सोशल मीडियावर शेअर केले होते.तर आता लग्न सोहळा पार पडल्यानंतर मुग्धाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आमचं झालंय… असं कॅप्शन तिने त्या फोटोंना दिलं आहे.या फोटोत मुग्धाने पिवळ्या रंगाची साडी नाकात साजेशी नथ,हातात हिरव्या बांगड्या,आंबाडा,मुंडावळ्या असा नववधुचा साजश्रृंगार मुग्धवर अगदी उटुन दिसत आहे.याशिवाय प्रथमेशनं लाल रंगाचा कुर्ता आणि त्यावर पिवळ्या रंगाची शाल,तर धोतर नेसले आहे. असा दोघांचा पांरपारिक लूक साजेसा दिसत आहे.सारेगमपचा प्रवास सुरु झाला त्यानंतर मैत्री आणि मैत्रीचं प्रेमात रुपांतर आणि लग्नगाठ बांधेपर्यतचा त्याचा प्रवास कसा होता तो जाणुन घ्या

मैत्री होतीच पण नंतर वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र कार्यक्रमांना सुरूवात झाली. त्यामुळे वेगळं भेटण्याची गरज नव्हती. यावेळीच दोघांच्याही मनात प्रेम निर्माण झाले. मात्र ते कोणी व्यक्त करायचं आणि कधी करायचं हाच प्रश्न होता आणि एकदा कार्यक्रमाच्या तालमीच्या आधी सहजपणे प्रथमेशने मुग्धाला आपल्या मनातील प्रेमाबाबत सांगितलं. मुग्धाला याची कल्पना होती. पण तरीही तिने लगेच होकार दिला नाही. २ दिवस विचार करून नंतर तिने प्रथमेशला होकार दिला. दोघांनीही एकमेकांना ४ वर्ष डेट केलं आणि त्यानंतर घरी आपल्या नात्याबद्दल सांगितलं. घरीही याची कल्पना होतीच. त्यामुळे कोणतेही आढेवेढे न घेता घरच्यांनीही या दोघांच्या लग्नाला होकार दिला.

मुग्धा आणि प्रथमेशने एका मुलाखतीमध्ये याबाबत अत्यंत मॅच्युरिटीने नात्याच्या बाबतीत आपली मतं व्यक्त केली होती. ज्यामध्ये मुग्धा असे म्हणते की, ‘आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करून गोष्टी सांगितल्या आहेत. पण त्या आपली जनरेशनम मान्य करत नाही. योग्य वयात योग्य गोष्ट व्हायला हवी जेणेकरून पुढच्या गोष्टी टाळणं शक्य होतं’ प्रेम तर हवंच पण त्यासह या गोष्टीही जपायला हव्यात. प्रथमेशच्या मते संसारात आणि लग्न करताना मुलींच्या अवास्तव अपेक्षा असतात. तर त्यावर मुग्धा म्हणते, ‘हो हे खरं आहे. पण हल्ली एकाच वयाच्या मुलामुलींची लग्न होतात पण जिथे आपण सेटल नाही तिथे मुलाने सेटल असावं अशी अपेक्षा मुलींनी करणं अत्यंत चुकीचं आहे. नात्यात समानता ही मग या अपेक्षा कशा असू शकतात. कधीकधी आई-वडिलांच्या अपेक्षांचं ओझं येतं ते योग्य नाही’

सध्याची जनरेशन ही लग्नपाासून का पळते या प्रश्नावर अत्यंत मॅच्युरिटीने मुग्धाने उत्तर दिलंय की, आपल्या पिढीला मिळालं एक्सपोजर. ज्यामुळे अनेकांना आपलं स्वातंत्र्य हिरावलं जाणार आहे असं वाटतं. आपल्या जगाला कोणाचा धक्का लागू नये असं अनेकांना वाटल्यामुळेच लग्नापासून दूर राहिलं जातंय आणि जे आपल्याला योग्य वाटत नसल्याचं मुग्धाचं म्हणणं आहे. संसार करताना या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा या मताचे दोघेही असल्यानेच यांच्याकडून या गोष्टी शिकत नक्कीच लग्नाचा विचार करणाऱ्यांनी ही मॅच्युरिटी जपावी.

 

 

 

 

 

Exit mobile version