सई ताम्हणकरच्या नव्या घरात दिवाळीनिमित्त खास कार्यक्रम! ‘या’ मराठी कलाकारांनी लावली हजेरी

सईने तिच्या युट्यूब चॅनेलवर नव्या घराची झलक शेअर केल्यावर कलाकार मंडळींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता दिवाळीचं औचित्य साधून सईने तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना खास कार्यक्रमाचं आयोजन करून घरी आमंत्रित केलं होतं.

सई ताम्हणकरच्या नव्या घरात दिवाळीनिमित्त खास कार्यक्रम! ‘या’ मराठी कलाकारांनी लावली हजेरी

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आपल्या अभिनय शैलीतून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.तर नुकतच आता सई ताम्हणकरने काही महिन्यांपूर्वी मुंबईत स्वत:चं पहिलं घर घेतलं. सांगलीहून मुंबईला आलेली सई गेली अनेक वर्ष मुंबईत भाड्याच्या घरात राहत होती. सईने आतापर्यत अनेक घर बदली होती,मात्र आता तिने स्वत:हाचे हक्काचे घर घेतले आहे. सईने तिच्या युट्यूब चॅनेलवर नव्या घराची झलक शेअर केल्यावर कलाकार मंडळींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता दिवाळीचं औचित्य साधून सईने तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना खास कार्यक्रमाचं आयोजन करून घरी आमंत्रित केलं होतं. याचे फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सई ताम्हणकरने तिच्या नव्या आलिशान घराला ‘द इलेव्हन्थ प्लेस’ असं नाव दिलं आहे. अभिनेत्रीने नव्या घराचा व्हिडीओ शेअर केल्यावर यामधील शोभेच्या वस्तू, मोठ्या खिडक्या, आकर्षक फर्निचर, मोठा वॉर्डरोब, हॉलमध्ये ठेवलेली झाडं आणि प्रशस्त खोल्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

नव्या घरासाठी सईला तिच्या मराठी कलाविश्वातील जवळच्या मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या होत्या. आता दिवाळीचं औचित्य साधून तिने या सगळ्या मित्रांना घरी आमंत्रित केलं होतं. आपल्या मित्रमंडळींसाठी सईने खास ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याचे बरेच फोटो सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सईचं नवं घर पाहण्यासाठी आणि तिला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ,प्रिया बापट,सारंग साठ्ये, कादंबरी कदम, समीर विध्वंस, उमेश कामत असे बरेच कलाकार पोहोचले होते. प्रिया बापट या कार्यक्रमाचे फोटो शेअर करत लिहिते, “खूप प्रेम सई ताम्हणकर…या सुंदर दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी खूप खूप धन्यवाद!”

दरम्यान, सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या दोघीही सध्या मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. या दोघीही एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे प्रियाने लाडक्या मैत्रिणीला नव्या घरासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.दरम्यान सई ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असल्यामुळे तीचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे.

हे ही वाचा : 

हमासवर विश्वास नाही – इस्रायली संरक्षणमंत्र्यांचा दावा

पाच राज्यांतील निकालानंतर ‘इंडिया’ आघाडीत जागा वाटपाला गती – जयंत पाटील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version