अभिनेता स्वप्नील जोशीचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण, घटस्थापनेच्या मुहूर्तावर चाहत्यांना दिली गुडन्यूज

स्वप्नील जोशीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.विशेष म्हणजेत्याने घटस्थापनेच्या मुहूर्तावर चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.

अभिनेता स्वप्नील जोशीचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण, घटस्थापनेच्या मुहूर्तावर चाहत्यांना दिली गुडन्यूज

मराठी सिनेविश्वातील कलाकार आता उचं गगन भरारी घेताना आपल्याला दिसून येत आहेत.आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला एका विशिष्ट उचींवर नेण्याचा प्रयत्न सगळेच मराठी कलाकार करताना दिसून येत आहेत.दरम्यान मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘चॉकलेट हिरो’ अशी आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. स्वप्नील हा मराठी मनोरंजनसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत विविध नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिजमध्ये काम केले आहे. स्वप्नील हा नेहमीच सोशल मीडियावर आपले नवनवीन व्हिडिओ शेअर करताना दिसून येत असतो, आणि त्यामुळे त्याचा चाहता वर्ग ही चांगलाच मोठा आहे. आता स्वप्नील जोशीने त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.

तर नुकतच आता स्वप्नील जोशीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.विशेष म्हणजेत्याने घटस्थापनेच्या मुहूर्तावर चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. स्वप्नील जोशीने नुकतंच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या नावाची घोषणा करत या चित्रपटाबाबतची पोस्ट शेअर केली आहे.त्याने पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘नाच गं घुमा’ असे त्याच्या मराठी चित्रपटाचे नाव आहे.

काम करत असताना कलाकार म्हणून माझ्या निर्मात्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, माझ्या स्वप्नांना बळ दिलं ! कदाचित म्हणूनच हे धाडस ! मित्रांच्या मदतीने, सह-निर्माता म्हणून एक नवीन प्रवास सुरु करतो आहे ! आईचा आशीर्वाद आहेच ! तुमचा ही असुद्या !

घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर, जगातील सर्व सर्व स्त्रियांना त्रिवार वंदन करून घेवून येत आहोत… आमच्या नव्या चित्रपटाची घोषणा.. ‘नाच गं घुमा’. भेटूया चित्रपटगृहात १ मे २०२४ ला !”, असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे.

याबरोबरच स्वप्नीलने  या चित्रपटाचा एक टीझर व्हिडीओही शेअर केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी करणार आहेत. त्यांनी आतापर्यंत ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘वाळवी’, ‘आत्मपॅम्प्लेट’ यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.दरम्यान चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबतची कोणती माहिती अजूनही देण्यात आलेली नाही.मात्र या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक असणार हे नक्की.

हे ही वाचा : 

प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर ‘पठ्ठे बापूराव’चित्रपटातून पुन्हा एकत्र, नव्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आलं समोर

दिग्दर्शक रवी जाधव यांनी खरेदी केली इकोफ्रेंडली गाडी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Exit mobile version