spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

 प्रसाद जवादे-अमृता देशमुखने घेतली सप्तपदी,पारंपारिक लूक मधील फोटो आले समोर

मराठी कलाविश्वात सध्या कलाकारांना लगनाचे वेद लागले आहेत. गेल्या कित्येक दिवसापासून चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ती टीव्ही विश्वातील लोकप्रिय जोडी अखेर लग्नबंधनात अडकली आहे.अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. आता त्यांच्या शाही विवाहसोहळ्यातील खास क्षणांचा व्हिडिओ समोर आला आहे. यांचा लग्नसोहळा जवळचे नातेवाईक आणि मराठी कलाकारांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला आहे.

प्रसाद आणि अमृताने लग्नासाठी खास पांरपरिक लूक केला होता. गुलाबी रंगाच्या साडीत अमृताचं सौंदर्य खुलून आलं होतं. प्रसादने पिवळ्या रंगाचं पितांबर नेसल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे, तर धोतर, सदरा आणि टोपी असा मराठमोळा लूक प्रसादने केला होता. प्रसाद आणि अमृताने मित्रपरिवार, कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नातील सप्तपदीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये प्रसादने केलेल्या कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी प्रसाद आणि अमृताला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रसाद आणि अमृताची  ‘बिग बॉस मराठी’च्या पहिली भेट झाली होती. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात ते दोघेही सहभागी झाले होते. ‘बिग बॉस’च्या घरातच त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. बिग बॉस’मुळे यांची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती ,घरातून बाहेर पडताच त्यांनी प्रेमाची कबुली देत गुपचूप साखरपुडाही उरकला होता. आता लग्नबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

प्रसाद आणि अमृता दोघेही उत्तम कलाकार आहेत. त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.  त्यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, पृथ्विक प्रताप हे कलाकार उपस्थित होते. तर प्रार्थना बेहेरेनेही पतीबरोबर त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.

बिग बॉसच्या घरात प्रेमाची चाहूल लागल्यानंतर प्रेमात पडलेल्या या दोघांनी घरातून बाहेर आल्यानंतर आपल्या प्रेमाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आणि आता त्यांचा खऱ्या अर्थाने आयुष्यभराच्या साथीदाराचा प्रवास सुरु झाला,दरम्यान हे दोघ प्रेमात असल्याची चाहूल प्रेक्षकांना ही दिसत असल्यामुळे आता या बिग बॉस’च्या ऑनस्क्रीन जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र पाहून दोघांचेही चाहते सध्या आनंद व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा : 

KDMC: नव्या महिला आयुक्तांची नियुक्ती

PUNE: नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss