spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रसादनं गळ्यात घातलं अमृताच्या नावाचं लॉकेट,फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मराठी टेलिव्हिजन विश्वातील आणि बिग बॉस मधून घराघरात पोहचलेली सगळ्यांची आवडती जोडी प्रसाद आणि अमृता यांनी १८ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली

मराठी टेलिव्हिजन विश्वातील आणि बिग बॉस मधून घराघरात पोहचलेली सगळ्यांची आवडती जोडी प्रसाद आणि अमृता यांनी १८ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली.’बिग बॉस मराठी’ च्या घरातून सुरू झालेली ही मैत्री आता लग्नमंडपापर्यंत पोहोचली. या जोडीने आधी आपल्या प्रेमाची कबुली देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांना एकत्र पाहून चाहतेही खुश झाले होते. आता अखेर ते दोघेही विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल झाले. त्यांचे कपडे, दागिने चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.अमृता आणि प्रसादचे लग्नातील वेगवेगळे आउटफिट सगळ्यांचेच लक्ष वेधत होते.विशेष म्हणजे अमृताचे फुलांच्या पाकळीचे मंगळसूत्र विशेष लक्षवेधी ठरलं आहे,तर प्रसादनेही एक अनोखी परंपरा सुरू करत अमृताच्या नावाचं लॉकेट गळ्यात बांधलं आहे.

प्रसाद आणि अमृताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांच्या हळद आणि संगीत सेरेमनीचे व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडले. अशात त्यांच्या लग्नविधींचा एक व्हिडिओ चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. ज्यात प्रसाद त्याच्या गळयात एका चैनमध्ये काहीतरी बांधत आहे. त्यात एक लॉकेट आहे. त्या पेंडन्टवर अमृताचं नाव लिहिलं आहे. प्रसाद ते लॉकेट त्याच्या गळ्यात घालतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं. हे लॉकेट अमृताचे बाबा त्याच्या हातात देतात. अमृताच्या घरच्यांनी हे लॉकेट खास प्रसादासाठी बनवलं आहे. यानंतर चाहते त्यांचं खूप कौतुक करत आहेत. अमृता आणि प्रसादमधलं हे प्रेम पाहून नेटकरीही भारावले आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं,’ नवरा असावा तर असा.’ आणखी एकाने लिहिलं, ‘अमृतमय जाहलो चा खरा अर्थ आज समजला.’.’ त्यांच्या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

अमृता आणि प्रसादचा बिग बॉसच्या घरातून सुरु झालेला हा प्रवास अखेर लग्नापर्यंत येऊन पोहचल्याने चाहत्यांमध्ये देखील आनंद आहेच,मात्र त्यांच्या मित्र मंडळीनमध्ये देखील तितकाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला आहे.लग्नाला अनेक कलाकार मंडळीने हजेरी लावत त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Latest Posts

Don't Miss