चिन्मय उदगीरकरच्या आगामी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित

बहुप्रतिक्षीत आतुर या सिनेमातून चिन्मय उदगीरकर (chinmay udgirkar) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येताय

चिन्मय उदगीरकरच्या आगामी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित

बहुप्रतिक्षीत आतुर या सिनेमातून चिन्मय उदगीरकर (chinmay udgirkar) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येताय.चिन्मय उदगीरकरला आपण बऱ्याचं मराठी मालिकांमध्ये काम करताना पाहयला आहे.चिन्मयच्या प्रत्येक मालिका या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस येतात.चिन्मयसह अनेक मराठी कलाकार या चित्रपटात काम करताना दिसून येणार आहेत.

दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी ‘धग’, ‘भोंगा’ या सारखे गाजलेले चित्रपट प्रेक्षकांना दिले.तर आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्तम कथानक असलेले चित्रपट सिनेसृष्टीला दिले. त्यामुळे त्यांच्या सिनेमाची प्रेक्षक कायमच आतुरतेने वाटत पाहत असतात. यामध्येच त्यांचा ‘आतुर’ हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचा पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे.

बुधवारी (११ ऑक्टोबर) आतुर या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. त्यामुळे आता या सिनेमाविषयी असलेली प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.तर  प्रत्येक जण या सिनेमाविषयी अधिकाधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.पोस्टरमध्ये चित्रपटातला एक प्रसंग दिसत असून त्यात प्रीती मल्लापुरकर पाठमोऱ्या उभ्या असून मागे योगेश सोमण जमिनीवर बसले आहेत. ते घराच्या एका खोलीत असून तिथे बरीच काढलेली चित्रं भिंतीवर किंवा स्टँडवर लावलेली आहेत. त्यामुळे त्या दोघांच्या व्यक्तिरेखांविषयीही अंदाज लावले जात आहेत.

आतुर या आगामी सिनेमात अभिनेत्री प्रिती मल्लापुरकर ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर या सिनेमात तिच्यासोबत योगेश सोमण, चिन्मय उदगीरकर, प्रणव रावराणे ही कलाकार मंडळी देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. झेनिथ प्रोडक्शनच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी तर कथा-पटकथा तेजस परसपाटकी, आनंद निकम व किरण जाधव यांनी लिहिली आहे. अशी तगडी कास्ट असलेला आतुर हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.दरम्यान प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुक्ता आहे.

या सिनेमाच्या निमित्ताने प्रणव रावराणे, आणि चिन्मय उदगीरकर हे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसुन येणार आहे.प्रणव रावराणे हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.

हे ही वाचा: 

“त्यांनी” महाराष्ट्राचा जीव घेतला- आशिष शेलार

माझ्या गाडीत आणि कार्यक्रमात महिलांना प्राधान्य- राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version