spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरने दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली पहिली गाडी

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून सिद्धार्थ चांदेकर(sidharth chandekar) आणि मिताली मयेकरला(mitali mayekar) ओळखले जाते.या दोघांनीही सिनेसृष्टीत आपलं वेगवेगळ स्थान निर्माण केलं आहे.

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून सिद्धार्थ चांदेकर(sidharth chandekar) आणि मिताली मयेकरला(mitali mayekar) ओळखले जाते.या दोघांनीही सिनेसृष्टीत आपलं वेगवेगळ स्थान निर्माण केलं आहे.आता लवकरच सिद्धार्थ चा झिम्मा २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान ही दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.दोघपण आपले नवनविन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत नेहमी अपडेट असतात.आणि चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.तर नुकतीच दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सिद्धार्थ-मितालीने त्यांची पहिली आलिशान गाडी खरेदी केली आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सिद्धार्थने गाडीबरोबरचा खास फोटो शेअर करत लाडक्या बायकोचं कौतुक देखील केलं आहे.

सिद्धार्थ-मितालीने गेल्यावर्षी मुंबईत हक्काचं पहिलं घर खरेदी करत आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली होती.त्यावेळी ही त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत दोघांच कौतुक केलं होत.

यानंतर आता यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालेलं आहे. गाडीबरोबर फोटो शेअर करत अभिनेत्याने या फोटोला “आमची पहिली गाडी…Proud of you बायको! तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!” असं कॅप्शन दिलं आहे. तसेच दुसरीकडे, मितालीने गाडीचा व्हिडीओ शेअर करत “माझी लक्ष्मी आली” असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. दरम्यान गाडी जवळ उभं राहुन गाडीला मिठ्ठी मारत मितालीने फोटो शेअर केला आहे.

सिद्धार्थ-मितालीने दिवाळीच्या मुहूर्तावर Kia सेल्टोस ही गाडी खरेदी केली आहे. सध्या बाजारात या गाडीची किंमत Financial Express ने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास १०.८९ लाख ते १९.८० लाख (एक्सशोरुम) एवढी आहे. नव्या गाडीचे फोटो पाहून नेटकरी सिद्धार्थ-मितालीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, रसिका वेंगुर्लेकर, नचिकेत लेले, अपूर्व रांजणकर, नम्रता संभेराव, सुखदा खांडकेकर अशा मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.दरम्यान सिद्धार्थचा आगामी चित्रपट झिम्मा २ सध्या चर्चेत आहे,सिद्धार्थचे चाहते देखील त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे ही वाचा : 

दीपिका-रणवीरचे दिवाळीनिमित्त खास फोटो,चाहत्यांना दिल्या दिवळीच्या शुभेच्छा

World Diabetes Day 2023, मधुमेहाच्या बाबतीत भारत आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे… तर कोणता देश पहिल्या क्रमांकावर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss