spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अक्षया देवधरचा सिनेसृष्टीत कमबॅक,सायली संजीवसोबत करणार एकत्र काम

सध्या मराठी सिनेसृष्टीत नवनवीन धाटणीचे मराठी चित्रपट पाहायला मिळत आहे.त्यातच आता एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाला आहे. ‘पिल्लू बॅचलर’ असे या नव्या चित्रपटाचे नाव आहे.

सध्या मराठी सिनेसृष्टीत नवनवीन धाटणीचे मराठी चित्रपट पाहायला मिळत आहे.त्यातच आता एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाला आहे. ‘पिल्लू बॅचलर’ असे या नव्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातून अभिनेत्री अक्षया देवधर पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.दरम्यान लग्नानंतर खुप दिवस अक्षया सिनेसृष्टी पासून दुर आहे.यातच आता ती पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.त्यामुळे प्रेक्षक देखील अक्षयाला नव्या भुमिकेत पाहण्यासाठी आतुर आहेत.

‘पिल्लू बॅचलर’ या चित्रपटात विनोदी आणि एक हलकीफुलकी कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या नावावरुन यात प्रेमकथा पाहायला मिळेल, असा अंदाज लावला जात आहे. मात्र तरीही ही कथा काय असेल यांची उस्तुकत्ता प्रेक्षकांमध्ये आहे.

पिल्लू बॅचलर या चित्रपटात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे अशी जबरदस्त अशी हटकी स्टारकास्ट पाहायला मिळत आहेत. येत्या ८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

तर श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलं आहे. बस्ता, बरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी यापूर्वी दिले आहेत. या चित्रपटाचे गीतलेखन मंगेश कांगणे यांनी केले आहे. तर चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन, अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.

दरम्यान अक्षयाची तुझ्यात जीव रंगला ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर होती,प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरुन प्रतिसाद दिला, त्यांनतर मालिकेतील राणा-अंजलीवर तर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम ही केले,दरम्यान आता बऱ्याचं काळा नतंर अक्षया पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याने तिच्या चाहत्यांमध्ये अक्षयाच्या आगामी चित्रपटाबाबत उस्तुकत्ता असल्याची दिसून येत आहे.या चित्रपटात अक्षयासोबत सायली संजीव देखील स्क्रीन शेअर करणार असल्याचं दिसून येत आहे.

हे ही वाचा : 

तुम्ही देखील ‘लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप’ मध्ये आहेत? या चुका टाळा

‘झिम्मा २’ चा हटके टीझर प्रदर्शित,  पुन्हा एकदा ही महिला गँग रियुनियनसाठी सज्ज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss