spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

माधुरी दीक्षित यांच्या ‘पंचक’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

माधुरी दिक्षीत नेने आणि श्रीराम नेने यांच्या पंचकया चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

अभिनेत्री माधुरी दिक्षीत नेने या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी पंचक या सिनेमाबाबत चर्चेत आहे. दरम्यान माधुरी दिक्षीत नेने आणि श्रीराम नेने यांच्या पंचकया चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळवली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

पंचक या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला आपण पाहतो आहोत की काही कलाकार धावत आहेत.त्यानंतर एका कुटुंबातील व्यक्तीचे निधन होते. त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला पंचक लागते. ट्रेलरमध्ये अभिनेते विद्याधर जोशी हे पंचक लागणे म्हणजे काय असते? याचा अर्थ सांगताना दिसत आहेत. ते म्हणतात, “पंचक लागलं म्हणजे मृत्यूच्या घटकेपासून एका वर्षाच्या आत मृत व्यक्तीच्या कुटुंबातील किंवा जवळचे पाच मृत्यू संभवतात.” हे ऐकल्यानंतर कुटुंबातील सर्वच व्यक्ती घाबरतात.

पंचक या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर,आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता धुरी सागर शोध, संपदा कुलकर्णी ,आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, गणेश मयेकर आणि  आरती वडगबाळकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

माधुरी दीक्षितनं नुकताच पंचक या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला तिनं कॅप्शन दिलं, “सगळेच विचारतायत ‘आता कोणाचा नंबर?’होऊ दे चर्चा, घेऊन आलोय ‘पंचक’ चा ट्रेलर !! 5 जानेवारीपासून थिएटर्समध्ये लागणार हास्याचा पंचक.”

5 जानेवारी 2024 रोजी पंचक हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. म्हणजेच प्रेक्षकांच्या वर्षाची सुरुवात ही मनोरंजनानं होणार आहे. माधुरी दीक्षित आणि  श्रीराम नेने यांनी ‘15 ऑगस्ट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. आता त्यांचा पंचट हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.दरम्यान माधुरी यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांची जशी जुंबड पाहयला मिळायची तशीच गर्दी आता त्यांनी निर्मिती केलेल्या सिनेमाला पाहायला मिळणार का ? हे पाहणं आता औस्तुकत्तेचं ठरणार आहे.

Latest Posts

Don't Miss