प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर ‘पठ्ठे बापूराव’चित्रपटातून पुन्हा एकत्र, नव्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आलं समोर

लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांची जीवनगाथा ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर सादर करण्यात येणार आहे.

प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर ‘पठ्ठे बापूराव’चित्रपटातून पुन्हा एकत्र, नव्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आलं समोर

मराठी सिनेसृष्टीत आजकाल वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहायला मिळत आहे.आणि वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनवले देखील जात आहेत.जे प्रेक्षकांच्या चांगल्याचं पसंतीस उतरत आहेत.दरम्यान अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट मागील वर्षी म्हणजेच २९ एप्रिल २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होत.. चंद्रमुखी चित्रपटाच्या भरघोस यशानंतर प्रसाद-अमृता पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटात एकत्र काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या नव्या चित्रपटात अमृता खानविलकर आणि प्रसाद ओक मुख्य भूमिका साकारणार आहेत.
घटस्थानपनेच्या मुहूर्तावर प्रसादने या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे.

लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांची जीवनगाथा ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर सादर करण्यात येणार आहे. आबा गायकवाड यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे.तर स्वत:प्रसाद ओकने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.यापूर्वी त्याने, ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ ‘कच्चा लिंबू’,  अशा अनेक चित्रपटांसाठी दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.आणि प्रसादने दिग्दर्शन केलेल्या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटात ‘पवळा’च्या भूमिकेत दिसुन येणार आहे.अमृता सध्या नवनविन धाटणीच्या भुमिका अत्यंत उत्तमरित्या साकारताना दिसून येत आहे.तिच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षक देखील चांगलीचं पसंती देत आहेत.

‘घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रसादने नव्या चित्रपटाचं पोस्टर सर्वत्र प्रदर्शित केलं आहे. चित्रपटाचं पोस्टर शेअर करत प्रसाद लिहितो, “अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून माझी नवी कलाकृती…! आशीर्वाद असू द्या मायबापहो…! नवनव्या कवनांचा रोज नवा डाव, लेखणीनं घेतला काळजाचा ठाव, जगताना सोसले अनेक घाव शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव, कलारत्न ‘पठ्ठे बापूराव’”

नव्या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केल्यावर प्रसाद ओकवर सिनेसृष्टीतून आणि त्याच्या मित्रमंडळींकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. श्रीधर श्रीकृष्ण कुलकर्णी रेठरेकर महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेत ‘पठ्ठे बापूराव’ या नावाने प्रसिद्ध झाले. परंतु, त्यांना त्यांच्या जीवनात मोठा संघर्ष करावा लागला.तर प्रसाद ओक पठ्ठे बापूरावांचा हाच जीवनसंघर्ष  त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर सादर करणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुकता कायम असणार आहे.

हे ही वाचा : 

दिग्दर्शक रवी जाधव यांनी खरेदी केली इकोफ्रेंडली गाडी

प्रभासने डिलीट केले सोशल मीडिया अकाउंट चर्चांना उधाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Exit mobile version