spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘लंडन मिसळ’ चित्रपटात भरत जाधव झळकणार हटके भूमिकेत

‘लंडन मिसळ’ चित्रपटात भरत जाधव झळकणार हटके भूमिकेत

नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये गाजलेलं नाव म्हणजे भरत जाधव. त्यांनी आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र गेली अनेक वर्षे ते सिनेसृष्टीपासून दूर आहेत. मात्र आता लवकरच भरत जाधव सिनेसृष्टीत पुन्हा पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. भरत जाधव लवकरच एका चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

‘लंडन मिसळ’ या चित्रपटाचे शूटींग लंडनमध्ये आणि भारतात करण्यात आले आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट प्रेरित आहे. या चित्रपटाची कथा आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यावेळी ज्या दिव्यातून त्यांना जावं लागतं त्याची कथा म्हणजे लंडन मिसळ. अर्थातचं चित्रपटात भरत जाधव असल्यामुळे विनोदाची मेजवानी पाहायला मिळणारचं. या चित्रपटात नाटक, अभिनय, संगीत, नृत्य, खळखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ याची जुगलबंदी अनुभवायला मिळणार आहे.

येत्या ८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भरत जाधव एका हटके भूमिकेत दिसणार आहेत. तसेच यात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत. तर सह-निर्माते सानिस खाकुरेल आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर सह-दिग्दर्शन वैशाली पाटील यांनी केले आहे. याचे पटकथा-संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत.

ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसेच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाद्वारे भरत जाधव बऱ्याच वर्षांनी मोठ्या आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच या चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलं आहे.

हे ही वाचा : 

‘झिम्मा२’ मध्ये झळकणार अभिनेत्री रिंकू आणि शिवानी 

मनोज जरांगेंना तातडीनं अटक करा : गुणरत्न सदावर्ते

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss