spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता-सागरचं अलिबागमध्ये पार पडलं खास लग्नाचं केळवण

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता-सागरचं अलिबागमध्ये पार पडलं खास लग्नाचं केळवण

छोट्या पडद्यावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे.मालिकेवर तर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतातच,मात्र मालिकेतील कलाकारांवर देखील प्रेक्षक चांगली पसंती दाखवतात.तर नुकतच मालिकेत आता मुक्ता आणि सागरच्या लग्नाची लगबग सुरु आहे.. आतापर्यंत मालिकेच्या कथानकामध्ये साखरपुडा, मेहंदी, संगीत आणि हळद हे कार्यक्रम पार पडले आहे. २५ डिसेंबरपासून ‘प्रेमाची गोष्ट’चे विवाह स्पेशल एपिसोड पाहायला मिळतील.तर लग्न म्हंटलं तर लग्ना आधी नवरा-नवरीचा केळवण हे होतचं ही परंपरा आहे,तर मग आपले मुक्ता-सागर का मागे राहतील,तर विशेष गोष्ट अशी घडली आहे की, सागर आणि मुक्ताच केळवण चक्क अलिबागमध्ये होणार आहे,तर यासाठी मुक्ता आणि सागर अलिबागमध्ये पोहोचले आहेत. त्यांचा एक व्हिडिओही इन्स्टाग्रामवर समोर आला आहे. होणाऱ्या नवरा-नवरीचं कोडकौतुक करायचा सोहळा म्हणजे ‘केळवण’.

मुक्ता आणि सागर यांचं केळवण थेट अलिबागमध्ये पार पडलं. सोशल मीडियावर विशेष लोकप्रिय असणाऱ्या नलिनी मुंबईकर या इन्फ्लूएन्सर काकूंनी त्यांचे केळवण केले. कोळी कुटुंबातील सागरचे केळवण असल्याने त्यांनी यावेळी खास माशांचा बेत केला तर मुक्ता गोखलेसाठी शाकाहारी जेवणाची मेजवानी होती. नलिनी यांनी सोशल मीडियावर या केळवणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मुक्ता आणि सागर यांच्यासह सागरची आई इंद्रा कोळी आणि लेक सईदेखील या केळवणासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी अलिबागकरांनी अत्यंत पारपंरिक आणि कोळी स्टाइलने नृत्य करत  कोळी गाण्यांच्या ठेक्यावर कलाकारांचं स्वागत झालं  ‘प्रेमाची गोष्ट’मधील कलाकारांचे स्वागत केले. यावेळी मुक्ताने खास उखाणाही घेतला.

नलिनी यांनी हा व्हिडिओ शेअर करताना असे लिहिले आहे की, ‘सागर मुक्ताचं केळवण.. मंडळी तुम्हाला माहीतच आहे की स्टार प्रवाहवरच्या प्रेमाची गोष्ट मालिकेत सागर कोळी आणि मुक्ता गोखले यांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. लग्नाच्या अगोदर आपल्याकडे होतं ते म्हणजे केळवण आणि म्हणूनच आपल्या अलिबागच्या कोळीणबाय नलिनी काकू मुंबईकर यांनी त्यांना कोळी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. सागरसाठी मासे आणि मुक्तासाठी भाजी अशा दोन्ही प्रकारचे पदार्थ बनवलेले आहेत. सोबत सई आणि इंद्रा आजी आहे म्हटल्यावर धमाल तर होणारच आहे.’ सोशल मीडियावर मुक्ता-सागरच्या या केळवणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

मुंबईहून अलिबागपर्यंत मालिकेची कास्ट फेरीबोटीने प्रवास करत पोहोचली, त्याचेही व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आले आहेत.आता सगळ्या चाहत्यानी उस्तुकत्ता आहे ती म्हणजे सागर आणि मुक्ताच्या लग्नाची.तर आता येणाऱ्या पुढील भागात आपल्याला मुक्ता – सागरचा विवाह सोहळा पाहयला मिळणार आहे.

हे ही वाचा:

आपण सरकारमध्ये गेलो त्यामुळे अनेक प्रश्न सुटले, उपमुख्यमंत्री अजित पवार

११ वर्ष डेट केल्यानंतर सुनील शेट्टीच्या मुलाचा गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss