spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘अ‍ॅनिमल’मधील गीतांजलीच्या भूमिकेबद्दल रश्मिका मंदानाने केलेली खास पोस्ट चर्चेत

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार बॅटिंग करत आहे

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाचा अ‍ॅनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार बॅटिंग करत आहे.चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे.तरीही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला जम चांगलाच बसवला आहे.. पण या चित्रपटाच्या कथेला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. यात रणबीर कपूरने रणविजय हे पात्र साकारलं आहे, तर रश्मिका मंदानाने त्याच्या पत्नीची गीतांजली नावाची भूमिका केली आहे. यात रणविजय विवाहित असून, दोन मुलं असूनही गीतांजलीची फसवणूक करतो असं दाखवण्यात आलं आहे. या सीनवरूनही बरीच टीका होत आहे.

या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल रश्मिका मंदानाने प्रतिक्रिया दिली आहे. अ‍ॅनिमल’मधील रश्मिकाच्या गीतांजली या पात्राला चित्रपट पाहिलेल्या लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. आपणच या भूमिकेबद्दल काही प्रश्न विचारले होते, असा खुलासा रश्मिकाने केला. “गीतांजली. मी तिचे एका वाक्यात वर्णन केले तर… तिच्या कुटुंबाला एकत्र ठेवणारी ही घरातील एकमेव शक्ती असेल. ती शुद्ध, खरी, कोणतेही फिल्टर नसलेली, मजबूत आहे.

कधी कधी एक अभिनेत्री म्हणून मी गीतांजलीच्या काही कृतींवर प्रश्न विचारले होते,” असं रश्मिकाने म्हटलं आहे. मला आठवतं की माझ्या प्रश्नांवर दिग्दर्शकाने मला सांगितलं होतं की ही रणविजय आणि गीतांजली यांची कथा आहे. या कथेत त्यांचे प्रेम आणि उत्कटता, त्यांचे कुटुंब आणि त्यांचं जीवन आहे. सर्व हिंसाचार, दुःख आणि असह्य वेदनांनी भरलेल्या जगात गीतांजली शांतता आणि विश्वास आणते. तिचा पती आणि मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी ती तिच्या देवाला प्रार्थना करते. ती सर्व समस्यारुपी वादळांना तोंड देते. आपल्या कुटुंबासाठी ती काहीही करायला तयार असते. गीतांजली माझ्या नजरेत अतिशय सुंदर आहे आणि काही अर्थाने ती अशा महिलांसारखी आहे ज्या आपल्या कुटुंबाचे रक्षण करत आहेत. थिएटरमध्ये यशस्वी आठवडा पूर्ण केल्याबद्दल ‘अॅनिमल’ टीमला शुभेच्छा,” असं रश्मिकाने लिहिलं.

दरम्यान, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा मागच्या आठ दिवसांपासून बॉक्स ऑफिसव धुमाकुळ घालताना दिसत आहे.हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने भारतात आतापर्यंत ३६१ कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास आतापर्यंत ‘अॅनिमल’ने ५६३ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची क्रेझ जर अशीच कायम राहिली तर चित्रपट लवकरच जगभरात १००० कोटींचा टप्पा ओलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा:

मनोज जरांगे यांची ज्या मैदानात सभा झाली त्याच मैदानावर आज भुजबळांची तोफ धडाडणार

WPL Auction 2024, महिला प्रीमियर लीगसाठी खेळाडू सज्ज, १६५ पैकी ३० खेळाडूंचे भवितव्य…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

                                

 

                                

 

Latest Posts

Don't Miss