spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘सालार’ तिसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिस गाजवतोय,सालारमुळे शाहरुखच्या डंकीला लागलं ग्रहण

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा  याचा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित असा ‘सालार’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा  याचा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित असा ‘सालार’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे.२२ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.दरम्यान चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने  पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.विशेष म्हणजे सालारने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे.

प्रशांत नील दिग्दर्शित सालार हा सिनेमा २०२३ या वर्षातील सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. इतकंच नाही तर देशातील सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या चित्रपटाच्या टॉप १० यादीत हा सिनेमा चौथ्या स्थानावर आहे. या चित्रपटासोबत  डंकी हा सिनेमा सुद्धा प्रदर्शित करण्यात आला होता.मात्र सालार चित्रपटामुळे शाहरुखच्या डंकी चित्रपटाला चांगलचं ग्रहण लागलं आहे. शाहरुखच्या डंकी या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. ‘डंकी’चे आत्तापर्यंतच्या कलेक्शनचे आकडे खुपच कमी आहे. त्यामुळे आता पाहिल्यानंतर राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी हा चित्रपट जवान-पठाणचा विक्रम मोडू शकणार नाही असं वाटत आहे.

आता चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. सॅक्निल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 29.2 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 29 कोटी तर दुसऱ्या दिवशी 20 कोटींची कमाई केली होती. यासह ‘डंकी’चे तीन दिवसांचे एकूण कलेक्शन आता 75.32 कोटींवर पोहोचले आहे.

शाहरुख खान, विकी कौशल, तापसी पन्नू आणि बोमन इराणी स्टारर ‘डंकी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन आणि जगपति बाबू यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने आतापर्यंत भारतात १५० कोटींच्या आसपास कमाई केली आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी ९० कोटी, दुसऱ्या दिवशी ५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. इतकंच नाही तर तिसऱ्या दिवशी या सिनेमाने ६५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा तीन दिवसांमध्ये २०० कोटींचा टप्पा गाठणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, सालार हा सिनेमा दोन पार्टमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या पहिल्या पार्टचं नाव ‘सालार: पार्ट1 सीजफायर’ असं असून दुसऱ्या पार्टचं नाव शौर्यंगा पर्व असं असणार आहे. सालार पार्ट १ हा सिनेमा तेलुगू, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज झाला आहे.दरम्यान आता पुढील काही दिवसात डंकी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपलं स्थान निर्माण करणार का? की सालार चित्रपटचं डंकी चित्रपटाला भारी पडणार हे पाहणं आता महत्तवाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता-सागरचं अलिबागमध्ये पार पडलं खास लग्नाचं केळवण

आपण सरकारमध्ये गेलो त्यामुळे अनेक प्रश्न सुटले, उपमुख्यमंत्री अजित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss