अखेर सलमानने त्या फोटोतील मुलीचं गुपित उलगडलं! सलमानची नवी पोस्ट

सलमानने आता या फोटोमधील मुलीबाबत गुपित उघडं केलं आहे. फोटोतील ती मुलगी कोण? याचं उत्तर भाईजानने चाहत्यांना नव्या पोस्टमधून दिलं आहे.

अखेर सलमानने त्या फोटोतील मुलीचं गुपित उलगडलं! सलमानची नवी पोस्ट

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान(SALMAN KHAN) एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करणार आणि सगळ्यांच लक्ष वेधून घेणार आणि मग ती चर्चेचा विषय ठरणार हे समीकरण न संपणारचं आहे. अशातच आता काल सलमान खानने एका मुली सोबतचा फोटो सोशल मीडियावर(SOCIAL MEDIA) शेअर केला,आणि या फोटोमध्ये सलमानने त्या मुलीबरोबर रोमँटिक पोझ दिली होती.  दरम्यान या पोस्टमुळे सगळीकडे एकचं खळबळ उडाली,आणि अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांनी त्याला विचारले,की भाईजान लग्न केलं का,आणि लग्न केलं तर ते कधी,केव्हा,कूठे केलं कोणाशी केलं,ती फोटोतली मुलगी कोण आहे? सलमानने शेअर केलेल्या फोटोतील मुलीने घातलेल्या जॅकेटवर २७/१२ असं लिहिलं होतं. असे अनेक प्रश्नांना सलमानला सामोर जावं लागलं होत.मात्र आता अखेर सलमान खानने या प्रश्नांना वाचा फोडली आहे,त्यानी या फोटोतील मुलगी कोण आहे, याच गुपित त्यानी सोशल मीडियावर शेअर करत उलगडलं आहे.

सलमानने आता या फोटोमधील मुलीबाबत गुपित उघडं केलं आहे. फोटोतील ती मुलगी कोण? याचं उत्तर भाईजानने चाहत्यांना नव्या पोस्टमधून दिलं आहे. सलमानने त्या मुलीबरोबरचे काही फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोत मात्र मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. सलमानने त्या मुलीबरोबर फोटोसाठी पोझही दिल्या आहेत. सलमानबरोबर या फोटोत दिसणारी ती मुलगी म्हणजे अभिनेत्री अलिजेह अग्निहोत्री आहे. सलमानच्या बिंग ह्युमन क्लोथिंग या ब्रँडसाठी त्यांनी हे खास फोटोशूट केलं आहे. या फोटोला त्याने “जिन्समध्ये आहे प्रेम आणि काळजी…” असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे ब्रँडच्या जाहिरातीसाठी भाईजानने ही पोस्ट केल्याचं उघड झालं आहे.

अलिजेह अग्निहोत्री ही सलमानची भाची आहे. तिची आई अलविरा अग्निहोत्री एक निर्माती आहे. तर वडील अतुल अग्निहोत्री अभिनेता आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमानने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर करत अलिजेह त्याची भाची असल्याचं सांगितलं होतं. ‘फॅरी’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. २४ नोव्हेंबरला  हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शत होणार आहे.

हे ही वाचा: 

अखेर सलमानने त्या फोटोतील मुलीचं गुपित उलगडलं! सलमानची नवी पोस्ट

देशातील भाजपाचे हुकुमशाही सरकार हाकलून लावणे हेच काँग्रेसचे उदिष्ट, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version