2023 मध्ये ‘या’ कलाकारांनी दिली आपल्या प्रेमाची कबुली

यंदाचे हे २०२३ चं वर्ष मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी एक सकारात्मक दृष्टीकोन देणारं ठरलं आहे.

यंदाचे हे २०२३ चं वर्ष मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी एक सकारात्मक दृष्टीकोन देणारं ठरलं आहे.अनेक कलाकारांचे सुर यंदा जुळले आहेत.या कलाकारांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तर चला तर मग जाणुन घेऊयात या वर्षभरात कोणकोणत्या कलाकारांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

 

अश्विनी महांगडे
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.अश्विनी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते आणि ती नेहमी कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत देखील असते.ती तिच्या आयुष्यातील काही गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.याचदरम्यान आता अश्विनीने तिचा आयुष्यभराचा जोडीदार निवडला आहे.आणि ही गोष्ट तिने यंदा सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या चाहत्यांना खुश खबर दिली आहे.सोशल मीडियावर तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.निलेश जगदाळे असं तिच्या जोडीदाराचं नाव आहे.आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर आता कायम अश्विनीला साथ देणाऱ्या तिच्या या जोडीदारासोबत अश्विनी कधी लग्न करणार यावर आता सगळ्यांच लक्ष लागलं आहे.
स्वानंदी टिकेकर
मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू प्रेक्षकांसमोर मांडणारे अभिनेते उदय टिकेकर यांची कन्या अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने देखील आपल्या प्रेमाची कबूली सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिली.स्वानंदी सोशल मीडियावर कायम अँक्टिव असते,ति तीचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते,स्वानंदी ही एक उत्तम अभिनेत्री आहे,छोट्या पडद्यावरील दिल,दोस्ती,दुनियादारी या कार्यक्रमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली,आणि स्वत:ची ओळख तिने निर्माण केली.तर स्वानंदीने काही महिन्यांपूर्वीच आपल्या प्रेमाची कबूली चाहत्यांना दिली.दरम्यान स्वानंदीचे सुर इंडियन आयडल फेम आशिष कुलकर्णीसोबत जुळलेले आहेत.आशिषला तिने आपल्या लाईफ पार्टनर म्हणून निवड केली आहे.तर नुकतचं काही महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडा देखील पार पडला आहे.तर चाहते आता त्याच्या लग्नाच्या प्रतिक्षेत आहेत.
पुजा सावंत
मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडणारी अभिनेत्री पुजा सांवत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुप चर्चेत आहे,आणि ते कारण देखील खुप खास आहे,कारण तरुणाच्या मनातली ताईद आणि ड्रीम गर्ल असलेली पुजा सावंत हिने आपल्या आयुष्याचा साथीदार शोधला आहे आणि तिला तो मिळाला देखील आहे.तिने नुकतचं साखरपुडा केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतं आपल्या प्रेमाची कबूली दिली आहे.सिद्धेश चव्हाण असं तिच्या जोडीदाराचं नाव आहे.आणि एका मुलाखतीत तिने सांगितले आहे की,तिचं हे अरेंच मॅरेंज असणार आहे,त्यामुळे आता पुजा केव्हा,कधी,आणि कुठे लग्न करणारं यासाठी तिचे चाहते देखील उस्तुक आहेत.

हे ही वाचा:

Depression म्हणजे नेमकं काय? कोणती असतात लक्षणे ? वाचा सविस्तर…

PM Ujjwala Yojana, LPG सिलिंडर 600 रु… तुम्ही देखील घेऊ शकता लाभ!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version