‘काला पानी’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अंगावर शहारे आणणारा ‘काला पानी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘काला पानी’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘काला पानी’ या वेबसिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.या सिरीजचा ट्रेलर पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. या वेबसीरिजची घोषणा झाल्यापासून या सीरिजबद्दल प्रेक्षकांना खुप उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी टीझर आऊट झाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली. आता या वेबसीरिजचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर आऊट झाला आहे. ‘काला पानी’ ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आली आहे. आता नेटफ्लिक्सने या सिनेमाचा ट्रेलर आऊट केला आहे. ‘काला पानी’ या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरया वेबसीरिजमध्ये तुम्हाला थरार, नाट्य आणि अॅक्शन पाहायला मिळेल. ही आश्चर्यकारक सीरिज प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल.

अंदमान आणि निकोबार बेटांच्या काळ्या पाण्यात लोक कसे जगतात हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या 2 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अनेक मनोरंजक दृश्ये दाखवण्यात आली आहेत..’काला पानी’ या वेबसीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच सिरीजचा ट्रेलर पाहुन प्रेक्षक कलाकारांचे कौतुक देखल करत आहेत.

‘काला पानी’ या सीरिजमध्ये मोना सिंह, आशुतोष गोवारीकर, अमेय वाघ, सुकांत गोयल, विकास कुमार, अरुशी शर्मा, राधिका मेहरोत्रा, चिन्मय मांडलेकर आणि पूर्णिमा इंद्रजीत महत्तवाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. 18 ऑक्टोबर 2023 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रदर्शित करण्यात येणार आहे.

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version