spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रणबीरच्या ‘ॲनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमधमाका, सहा दिवसांत केली रेकॉर्डब्रेक कमाई

सध्या सगळीकडे 'ॲनिमल' चित्रपटाचा जोरदार बोलबाला सुरु आहे. १ डिसेंबरला'ॲनिमल' हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

सध्या सगळीकडे ‘ॲनिमल’ चित्रपटाचा जोरदार बोलबाला सुरु आहे. १ डिसेंबरला’ॲनिमल’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमातील डायलॉग, सीन्सची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘ॲनिमल’मधील रणबीरचा अवतार पाहून प्रेक्षकही भारावून गेले आहेत. या चित्रपटात रणबीरने साकारलेली भूमिका ही वाखडण्याजोगी आहे.या सिनेमातील रणबीरच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. सर्वत्र ‘ॲनिमल’चे शो हाऊसफूल होताना दिसत आहे.

‘ॲनिमल’ या बिग बजेट बॉलिवूड सिनेमात रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट आहे. या सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करायला सुरुवात केली होती. प्रदर्शनाआधीच ‘ॲनिमल’ सिनेमाने ‘ॲडव्हान्स बुकिंगमधून कोटी रुपये कमावले होते. टीझरपासूनच या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सिनेमांचे रेकॉर्ड मोडायला सुरुवात केली. प्रदर्शनानंतर सहा दिवसातंच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

रणबीरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार बॅटिग केली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी ६३.८ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर वीकेंडलाही या चित्रपटाने दमदार कमाई केली. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार या सिनेमाने सहाव्या दिवशी ३० कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत ‘ॲनिमल’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३१२.९६ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींचा आकडा पार केला आहे.

रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटानं रिलीजच्या सहाव्या दिवशी 30 कोटींचे कलेक्शन करुन शाहरुख खानच्या पठाण आणि जवानटा तसेच बाहुबली 2 चा चे रेकॉर्ड मोडला आहे.  अभिनेता प्रभासच्या ‘बाहुबली 2’ या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी कलेक्शन 26 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. शाहरुखच्या ‘पठाण’  या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी 25.5 कोटी कमाई केली होती. तर ‘जवान’ चित्रपटाने सहाव्या दिवशी 24 कोटींची कमाई  ‘अॅनिमल’ या सिनेमाला सेन्सॉरने ‘A’ सर्टिफिकेट दिलं. या चित्रपटामधील अॅक्सन सीन्सचं अनेकजण कौतुक करत आहेत. संदीप रेड्डी वांगा  यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात रणबीरसह रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.तृप्ती डिमरीने देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटामधील सतरंगा, अर्जन व्हेली या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच या चित्रपटातील एका सीनमध्ये डॉल्बी वाल्या या मराठमोळ्या गाण्याचा वापर देखील करण्यात आला आहे.दरम्यान हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

हे ही वाचा:

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील, बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

प्रसाद खांडेकर यांची खंत प्रवीण दरेकरांनी सभागृहात मांडली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss