सोनाली सोनावणेच्या जादुई आवाजाची भुरळ, प्रशांत नाकतीच्या ‘बाप्पा नादखुळा’ गाण्याची सर्वत्र होतेय चर्चा…

सध्या गणरायाच्या स्वागतासाठी भक्त मंत्रमुग्ध झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळत असतानाच अशातच चिमुकलीच्या आवाजात गणरायाला घातलेली साद साऱ्यांच्या मनावर राज्य करत आहे.

सोनाली सोनावणेच्या जादुई आवाजाची भुरळ, प्रशांत नाकतीच्या ‘बाप्पा नादखुळा’ गाण्याची सर्वत्र होतेय चर्चा…

सध्या गणरायाच्या स्वागतासाठी भक्त मंत्रमुग्ध झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळत असतानाच अशातच चिमुकलीच्या आवाजात गणरायाला घातलेली साद साऱ्यांच्या मनावर राज्य करत आहे. ‘बाप्पा नादखुळा’ या गाण्यातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात सुप्रसिद्ध संगीतकार प्रशांत नाकती यांचा मोलाचा वाटा आहे. ‘नखरेवाली’ या हिट गाण्यानंतर आता प्रशांत नाकती यांचं ‘बाप्पा नादखुळा# हे गणपती स्पेशल गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अनेक हिट आणि ट्रेंडिंग गाण्यानंतर आता प्रशांत नाकती यांचं आणखी एक नवं कोर गाणं साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

चिमुलकलीच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं हे गाणं कोणतीही AI Technology न वापरता सर्वांची लाडकी गायिका सोनाली सोनावणे हिने तिच्या खऱ्या खुऱ्या आवाजात गायलं आहे. सोनालीने आजवर अनेक हिट गाण्यांना आवाज दिला आहे. यांत भर घालत तिचा हा आगळावेगळा प्रयत्न साऱ्यांना मोहून टाकणारा आहे. प्रशांत नाकती यांच्या ‘बाप्पा नादखुळा’ या गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा रोहित जाधव याने पेलवली असून या गाण्यात विशाल फाले, निक शिंदे, तश्वी भोईर या कलाकारांना पाहणं रंजक ठरत आहे. तर सोनालीला या गाण्यासाठी रोहित राऊतची उत्तम साथ लाभलेली पाहायला मिळतेय. ‘बाप्पा नादखुळा’ हे गाणं प्रशांत नाकती यांच्या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

या गाण्याच्या अनुभवाबाबत बोलताना सोनाली असं म्हणाली की, “माझ्या वेगळ्याच आवाजात ‘बाप्पा नादखुळा’ हे गाणे रेकॉर्ड झालं. लहान मुलीच्या आवाजात गाण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. कधी तरी लहान मुलांच्या आवाजात सहज गाताना प्रशांत दादाने माझा आवाज ऐकला आणि माझ्याकडून गाण्याचे Scratch गाऊन घेतले. तोच Audio ऐकुन सर्व कलाकार आणि टीमने माझ्याच आवाजात गाणे रेकॉर्ड करायचं ठरवलं. गाणे गाण्यासाठी मी सुरवातीला अजिबात तयार नव्हते पण सर्व टीमने आग्रह केला आणि प्रशांत दादाने माझा आत्मविश्वास वाढवला. प्रशांत दादाने मला दिलेली ही खूप मोठी संधी आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही”.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version