लग्नाच्या ११ वर्षानी मोडला हेमा मालिनीच्या लेकीचा संसार,ईशा देओलने घेतला घटस्फोटाचा निर्णय

गेल्या अनेक दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या घटस्फोटाच्या चर्चाना उधाण आलं होत.

लग्नाच्या ११ वर्षानी मोडला हेमा मालिनीच्या लेकीचा संसार,ईशा देओलने घेतला घटस्फोटाचा निर्णय

गेल्या अनेक दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या घटस्फोटाच्या चर्चाना उधाण आलं होत. अखेर त्या बातमीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा ११ वर्षांचा संसार मोडला आहे.दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ईशा देओल आणि भरत यांनी संयुक्त निवेदनात त्यांच्या विभक्त झाल्याची माहिती दिली आहे. या निवेदनात दोघांनी म्हटले आहे की, ‘आम्ही परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनातील हा बदल आपल्या आणि आपल्या मुलांच्या दोघांच्या हिताचा आहे आणि तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आमच्या गोपनीयतेचा आदर केला जाईल अशी आम्हाला आशा आहे.’

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. गेल्या वर्षी जूनमध्ये तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ईशाने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते आणि तिच्या पतीवरील प्रेमही व्यक्त केलं होतं. मात्र हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला भरत उपस्थित नव्हता किंवा ईशाच्या वाढदिवसालाही तो उपस्थित नव्हता तेव्हापासून त्यांच्या नात्यातील मतभेदाच्या अफवा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर दोघांमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याची चर्चा रंगू लागली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या बातम्या येत होत्या. घटस्फोटाबाबत दोघांमध्ये बरीच चर्चा झाली होती. मात्र त्यांच्या घटस्फोटामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.

तिने इंस्टाग्रामवर एका गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आफताब शिवदासानीसोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कधीकधी तुम्ही गोष्टी सैल सोडल्या पाहिजेत आणि फक्त तुमच्या हृदयाच्या ठोक्यावर नाचले पाहिजे, असे म्हटले होते.आता अखेर ते विभक्त होत आहेत.

२०१२ मध्ये ईशा आणि भरत यांच लग्न झालं. दोघांचं लग्न इस्कॉन मंदिरात पार पडलं होतं. 2017 मध्ये त्यांना राध्या ही पहिली मुलगी झाली. त्यानंतर 2019 मध्ये दुसरी मुलगी मिराया हिचा जन्म झाला. आणि आता दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

Devendra Fadanvis होऊ शकतील दुसरे धडाकेबाज गोपीनाथ मुंडे? | Sanjay Raut | Devendra Fadnavis

‘तुमची एवढी सोन्यासारखी मुलगी’…लग्नापूर्वी अंजिक्यने मानले शिवानीच्या आई-बाबांचे आभार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version