प्रदर्शनाआधीच ‘रामसेतू’ वादाच्या भोवऱ्यात

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) अगामी चित्रपट ‘राम सेतू’ (Ram Setu) हा वादाच्या भोवऱ्यात सापडत चालला आहे.

प्रदर्शनाआधीच ‘रामसेतू’ वादाच्या भोवऱ्यात

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) अगामी चित्रपट ‘राम सेतू’ (Ram Setu) हा वादाच्या भोवऱ्यात सापडत चालला आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांच्या निशाण्यावर ‘राम सेतू’ हा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात चुकीची माहिती देत चित्रण केल्याचा आरोप करत सुब्रमण्यम स्वामी यांनी अक्षय कुमारसह (Akshay Kumar) 8 जणांवर केला आहे.

अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’ या चित्रपटात अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) आणि जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘राम सेतू’मध्ये अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिससोबत अभिनेता सत्यदेव कंचरण देखील दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये तिघेही एका भव्य कलाकृतीसमोर उभे आहेत आणि कशाचातरी शोध घेत आहेत. यावेळी अक्षयच्या हातात मशाल दिसत आहे, तर जॅकलिनच्या हातात टॉर्च धरलेली दिसत आहे.

अभिनेता अक्षय कुमारसह ८ जणांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अक्षय कुमारच्या आगामी ‘राम सेतू’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला तथ्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. भाजप नेते आणि माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत सांगितले की, ‘अक्षय कुमार (Akshay Kumar), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) यांच्यासह एकूण 8 जणांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.’ सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या चित्रपटात केलेल्या चित्रणामुळे रामसेतू्च्या प्रतिमेला धक्का लागला आहे, असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मुंबई चित्रपटसृष्टीतील लोकांना खोट्या आणि चुकीच्या गोष्टी दाखवण्याची सवय झाली आहे. त्यामुळे त्यांना इंटलॅक्चुअल प्रॉपर्टी राईट्सबद्दल माहिती देण्यासाठी मी अक्षय कुमार आणि रामसेतूशी संबंधित ८ लोकांना वकील सत्य सबरवाल यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

‘राम सेतू’ हा चित्रपट अभिषेक शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रीकरण पूर्ण झाल्याने आता चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू झाले आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

हे ही वाचा :- 

मेट्रो ३ ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’चा लवकरच पहिला टप्पा पूर्ण, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ट्रायल रन

शिवसेनेपाठोपाठ भाजपसुद्धा राबवणार ‘गाव तेथे शाखा’ मोहीम

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version