हिपोक्रॅसीचीही काही मर्यादा असते , उर्फी जावेदने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचले

शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता या वादामध्ये आता उर्फी जावेदने (Urfi Javed) उडी घेतली आहे.

हिपोक्रॅसीचीही काही मर्यादा असते , उर्फी जावेदने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचले

शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता या वादामध्ये आता उर्फी जावेदने (Urfi Javed) उडी घेतली आहे. नेहमी माझ्या कपड्यावर बोलणाऱ्या माझ्या कॅरेक्टरवर बोट दाखवणाऱ्या आणि मला धमकी देणाऱ्या चित्रा वाघ आता शीतल म्हात्रे यांना लढण्याचा सल्ला देत आहेत. उर्फी चित्रा वाघ यांना म्हणाली की, हिपोक्रॅसीचीही (Hippocracy) काही मर्यादा असते हे या महिलेला सांगा कोणीतरी अशा शब्दामध्ये उर्फी जावेदने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर टीका केली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणामध्ये भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्विटरच्या माध्यमातून त्यांना लढण्याचा सल्ला दिला आहे. त्या ट्विटमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या की, “शितल तू लढ आम्हीस सगळ्या तुझ्यासोबत आहोत. हा विषय फक्त शितलपुरता मर्यादित नाही. राजकारणामध्ये काम करणाऱ्या कोणत्याही महिलेसोबत भविष्यामध्ये या गोष्टी घडू शकतात. मुंबई पोलिसांना आवाहन करण्यात आले या हरामखोरांना अजिबात सोडू नका यांचा करविता कोण आहे त्याला शोधून काढा आणि त्यांच्या आधी मुसक्या आवळा.

चित्रा वाघ यांच्या या सोशल मीडियाच्या प्रतिक्रियेला उर्फी जावेद हिने रिट्विट करत उत्तर दिले आहे. उर्फी जावेद म्हणते की, “जेव्हा माझ्या कपड्यांवरून ही महिला माझ्या कॅरेक्टरवर बोट दाखवत होती ते विसरली. मला तुरुंगात टाकण्याच्या धमक्या आणि मागणी करत होती. उघड उघड माझं डोकं फोडण्याची धमकी देत होती. वाह वाह वाह वाह…..हिपोक्रॅसीची पण काहीतरी मर्यादा आहे हे या महिलेला सांगा असे उर्फी ने ट्विट मध्ये लिहिले आहे.

हे ही वाचा :

ईडीच्या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांना भावना झाल्या अनावर

Satish Kaushik यांच्या मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण? पोलिसांना सापडली औषधे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version