कतरिना ची हुबेहूब कॉपी

बॉलिवूड अभिनेत्यांचे अनेकजण चाहते आहेत.सध्या रील मुळे अनेकचाहते त्यांच्यासारख्या अभिनय करण्याचा प्रयत्न करत असतात.

कतरिना ची हुबेहूब कॉपी

बॉलिवूड अभिनेत्यांचे अनेकजण चाहते आहेत.सध्या रील मुळे अनेकचाहते त्यांच्यासारख्या अभिनय करण्याचा प्रयत्न करत असतात.तर काही जण  मेकअप करून त्यांच्या सारखं दिसण्याचा प्रयत्न करत असतात.आणि अनेकदा बॉलिवूड सारख्या हुबेहूब दिसणाऱ्या लोकांचे फोटोज सोशलमीडियावर चांगलेच चर्चेला येत असतात.त्यांचे हे फोटोज पाहून आपण चकित होतो.तर सध्या अजूनएक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.बॉलिवूड ची सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ ही नेहमीच तिच्या रूपामुळे चर्चेत दिसून येत असते.

तर सोशल मीडियावर एका मॉडेल चा फोटो बराचं चर्चेत येतोय. ती हुबेहूब कतरिना कैफ सारखी दिसून येतेय.हिला पाहून ही दुसरी तिसरी कोणी नसून कतरिनाच आहे असा भास होत आहे.पण ही कतरिना कैफ नाही. आम्ही बोलत आहोत फॅशन ब्लॉगर अलिना रायबद्दल. अलीनाकडे पाहून प्रथमदर्शनी कुणीही फसू शकेल इतक्या या दोघी सारख्या दिसतात.अलिना इन्स्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे.तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि लोक तिची तुलना कॅटरिना कैफशीच करतात.

इन्स्टाग्रामवर 1 लाख 40 हजार लोक अलिनाला फॉलो करतात.चाहतेकॅटरिना आणि अलिना यांच्या चित्रांचे कोलाज बनवून या दोघांची तुलना करत राहतात.कॅटरिना सारख्या असलेल्या लुक्स मुळेच अलिना अचानक सर्वांच्या डोळ्यासमोर आली आहे.अनेक जणांनी अलिनाला फॉलो करायला सुरुवात केली आहे.कतरिना सारखी अलिना तर दिसतेच पण त्याच सोबत अनेक अभिनेत्यांसारखे हुबेहूब दिसणारे लोक देखील चर्चेत आले आहे.बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्ता शाहरुख खान सारखा दिसणारा माणूस प्रचंड चर्चेत आला असून अनेकदा त्याला कॉमेडी रोल साठी आणलं जातं.

Exit mobile version