spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“तुमच्याकडे खूप घातक शस्त्र” ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित

त्याचवेळी त्याचा टीझर आज २ जानेवारीला रिलीज झाला आहे. ०१ मिनिट ३२ सेकंदात, तुम्हाला एक तासाचा संपूर्ण चित्रपट समजेल आणि तुम्हाला तो पाहिल्यासारखा वाटेल.

बॉलीवूडमध्ये महात्मा गांधींवर अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत, परंतु राजकुमार संतोषी आता ज्या प्रकारचा आशय घेऊन येत आहेत, तो प्रकार तुम्ही क्वचितच पाहिला असेल. ‘घायल’, ‘दामिनी’, ‘अंदाज अपना अपना’ यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांना भुरळ घालणारे निर्माते राजकुमार संतोषी पुन्हा एकदा धमाकेदारपणे पडद्यावर आले आहेत. ‘गांधी गोडसे – एक युद्ध’ या नव्या चित्रपटातून ते इंडस्ट्रीत पुनरागमन करत आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर २७ डिसेंबर रोजी रिलीज झाले होते. त्याचवेळी त्याचा टीझर आज २ जानेवारीला रिलीज झाला आहे. ०१ मिनिट ३२ सेकंदात, तुम्हाला एक तासाचा संपूर्ण चित्रपट समजेल आणि तुम्हाला तो पाहिल्यासारखा वाटेल.

या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरच्या सुरवातीलाच गांधी वधाचा सीन दाखवण्यात आला आहे, त्यानंतर नथुरामला अटक होऊन तो तुरुंगात दाखवण्यात आला आहे. मात्र यात एक वेगळा प्रयोग केला गेला आहे तो म्हणजे नथुराम आणि गांधी यांच्यातील वैचारिक मतभेद दाखवले आहेत. टीझरमध्ये ते एकमेकांसमोर आपले विचार मांडताना दाखवले आहेत. ज्यात नथुराम महात्मा गांधींवर आरोप करतो की, “तुमच्याकडेदेखील एक मोठे हत्यार आहे ते म्हणजे आमरण उपोषण तुम्ही सतत उपोषण करून लोकांना तुमच्यकडे वळवता हीदेखील एक मानसिक हिंसा आहे,” असा आरोप तो करतो. टीझरमध्ये हिंदू मुस्लिम दंगल, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सारा वल्लभाई पटेल यांची झलक पाहायला मिळते. टीझरला तितकेच उत्कृष्ट असे पार्श्वसंगीत देण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

 महात्मा गांधी म्हणतात की मानवतेला वाचवायचे असेल तर सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा त्याग करावा लागेल. त्यानंतर नथुराम राम गोडसेने टीझरमध्ये महात्मा गांधींच्या ‘आमरण उपोषणा’वर प्रश्न केला आहे. असे म्हटले आहे की तुमच्याकडेदेखील एक मोठे हत्यार आहे ते म्हणजे आमरण उपोषण तुम्ही सतत उपोषण करून लोकांना तुमच्यकडे वळवता हीदेखील एक हिंसा आहे, मानसिक हिंसा.

राजकुमार कुमार संतोषी यांचा हा चित्रपट २६ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दीपक अंतानी महात्मा गांधींची भूमिका साकारत आहेत, तर चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेच्या वेशात दिसणार आहे. या चित्रपटाची कथा स्वत: राजकुमार यांनी लिहिली असून ती त्यांच्याच प्रोडक्शन बॅनरखाली बनवली आहे. चित्रपटप्रेमी आणि राजकुमार संतोषी यांचे चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत.

हे ही वाचा:

डार्लिंग फेम विजय वर्मा करतोय तमन्ना भाटियाला डेट, व्हायरल फोटो आले समोर

अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला तिचा ग्लॅमरस लुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss