‘फैमिली पर आए तो डिस्कशन नहीं एक्शन करते हैं’, कार्तिक आर्यनच्या धमाकेदार चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज

त्याचवेळी कार्तिक आणि क्रिती लॉन्च इव्हेंटमध्ये अतिशय स्टायलिश लूकमध्ये पोहोचले. कार्तिक ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसला तर क्रितीने लाल ड्रेस परिधान केला होता.

‘फैमिली पर आए तो डिस्कशन नहीं एक्शन करते हैं’, कार्तिक आर्यनच्या धमाकेदार चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज

कार्तिक आर्यनचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘शेहजादा’चा ट्रेलर आज मुंबईत लाँच झाला आहे. पुन्हा एकदा कार्तिक आणि क्रिती सेनॉनची जोडी रुपेरी पडद्यावर थिरकण्यासाठी सज्ज झाली आहे. सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून ट्रेलर लाँच करण्यात आला. कार्तिक आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित धवन करत आहेत. ‘शेहजादा’ हा अल्लू अर्जुनच्या ‘आला वैकुंठपुरमुलू’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे.

त्याचवेळी कार्तिक आणि क्रिती लॉन्च इव्हेंटमध्ये अतिशय स्टायलिश लूकमध्ये पोहोचले. कार्तिक ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसला तर क्रितीने लाल ड्रेस परिधान केला होता ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. ट्रेलर इव्हेंट दरम्यान, कार्तिक स्कूटीवरच आपला स्वॅग दाखवताना दिसला.

कार्तिक आणि क्रिती सेनॉनचा ‘शेहजादा’ चित्रपटाचा ट्रेलर संपूर्ण अॅक्शनपॅक आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच कार्तिकच्या आवाजात अॅक्शनसह एक डायलॉग ऐकायला मिळतोय की, “फैमिली पर आए तो डिस्कशन नहीं एक्शन करते हैं’ यानंतर परेश रावल कार्तिक आर्यनच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतो, जो म्हणतो की त्याला बाऊन्सर व्हायचे आहे, असे लॉर आणि कार्तिक दोघेही सांगतात. त्याच वेळी, ट्रेलरमध्ये, कार्तिक देखील क्रिती सेनॉनला इम्प्रेस करताना दिसत आहे. दोघांची एकमेकांसोबतची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे. एकूणच ट्रेलर पाहून समजते की हा चित्रपट अॅक्शन, कॉमेडी, रोमान्सने भरलेला आहे. म्हणजेच शेहजादाकडून प्रेक्षकांना मनोरंजनाचा जबरदस्त डोस मिळणार आहे.

रिलीज होण्याआधी कार्तिकने इंस्टा वर एक फोटोही शेअर केला आहे. फोटोत तो देवाच्या समोर चित्रपटाच्या आणि ट्रेलरच्या यशासाठी हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे.

शहजादा’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर लाँच भव्य करण्यासाठी खास तयारी केली आहे. ‘शहजादा’च्या ट्रेलर रिलीजच्या निमित्ताने तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्याची सुरुवात १२ जानेवारीला मुंबईत ट्रेलर लाँचने झाली आहे. यानंतर १३ जानेवारीला ‘शहजादा’ची स्टार कास्ट कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन जालंधरमध्ये लोहरी साजरी करण्यासोबतच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार आहे. अखेर १४ जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कच्छमध्ये ‘शेहजादा’चा ट्रेलर रिलीज होणार आहे. ‘शेहजादा’ चित्रपट १० फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

टॉस श्रीलंकेच्या बाजूने, प्रथम फलंदाजीचा निर्णय

Makar Sankranti 2023 हे ट्रेंडी आउटफिट घालून मकरसंक्रांत करा साजरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version