प्रसिद्ध अभिनेत्याचे Facebook Page hack, पोस्ट करत दिली माहिती म्हणाला …

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास त्याच्या चित्रपटांमुळे बऱ्याच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा आदिपुरुष हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनानंतरच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्यातच आता प्रभासचा आगामी बहुचर्चित चित्रपट Kalki 2898 AD लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याचे Facebook Page hack, पोस्ट करत दिली माहिती म्हणाला …

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास त्याच्या चित्रपटांमुळे बऱ्याच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा आदिपुरुष हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनानंतरच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्यातच आता प्रभासचा आगामी बहुचर्चित चित्रपट Kalki 2898 AD लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रभासबरोबर अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण दिसून येणार आहेत. प्रभासचे देश-विदेशात प्रचंड चाहते आहेत. प्रभास सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील कोणतेही अपडेट सोशल मीडियावर शेअर करताना दिसत नाही. त्यातच आता प्रभास एका नव्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. प्रभासचे फेसबुक पेज हॅक झाल्याचे समोर आले आहे आणि मुख्य म्हणजे खुद्द प्रभासने याबाबद्दलची माहिती चाहत्यांना दिली आहे.

गुरुवारी २७ जुलैच्या रात्री प्रभासचे फेसबुक पेज हॅक करण्यात आले. हॅकर्सनी त्याच्या फेसबुकवरून ‘अनलकी ह्युमन’ आणि ‘बॉल फेल्स अराउंड द वर्ल्ड’ असे दोन व्हायरल व्हिडिओ शेअर केले होते. या घटनेनंतर प्रभासने ट्वीटरवर याबाबत ट्विट (Tweet) करत फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती दिली होती. तसेच टीम ही समस्या सोडवत असल्याचेही तो म्हणाला. (Hello Everyone,My Facebook Page Has Been Hacked. The Team is Sorting this Out.)

दम्यान आदिपुरुषच्या अपयशानंतर प्रभास आता ऍक्शन -थ्रिलर चित्रपट सालार पार्ट १: सीझफायरमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. ‘सालार’ (salar) केजीएफ युनिव्हर्स’चा एक भाग असल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत. या चित्रपटात प्रभासबरोबर श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच तो लवकरच ‘Kalki 2898 AD’ चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ रोजी थीएटर्समध्ये दाखल होणार आहे.

हे ही वाचा:

Amitabh Bachchan यांचे ‘ते’ ट्विट चर्चेत, चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

IRCTC सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे तिकीट आरक्षण यंत्रणा कोलमडली

Dream Girl 2 चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version