Raju Shrivastava : प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

Raju Shrivastava : प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

विनोद वीर राजू श्रीवास्तव हे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देताना अपयशी ठरले. रोज त्यांच्या प्रकृती बद्दल नवीन अपडेट समोर येत होते. मात्र, राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या ५९ वर्षे अखेरचा श्वास घेतला. एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली होती. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.

श्रीवास्तव हे त्यांच्या नियमित दिनचर्येनुसार, ते नेहमीप्रमाणे सकाळी जिममध्ये व्यायाम करत होते. ट्रेडमिलवर चालत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांची प्रकृती पाहता त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्बल ४२ दिवस ते रुग्णालयात आपल्या आजारावर मात करत होते. 

हेही वाचा : 

लालबागचा राजा मंडळाला मुंबई महापालिकेचा दणका, साडेतीन लाखांचा दंड आकारला

राजू श्रीवास्तव केवळ विनोदी कलाकारच नाही तर अभिनेते आणि राजकारणीदेखील होते. १९८८ मध्ये छोट्या भूमिकांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे राजू श्रीवास्तव सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ सिनेमात दिसले होते. नंतर त्यांनी आणखी काही सिनेमे केले आणि नंतर कॉमेडीमध्ये प्रवेश केला. राजू श्रीवास्तव यांना द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, कॉमेडी का महामुकाबला यांसारख्या शोमधून ओळख मिळाली. ते ‘बिग बॉस ३’ आणि ‘नच बलिए’ सारख्या शोमध्येही दिसले होते.

राजू श्रीवास्तव यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील राजू कायम सक्रीय असायचे. राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा श्रीवास्तव या गेल्या काही दिवसांपासून राजू यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांना माहिती देत होत्या. तसेच राजू यांचे भाऊ दीपू श्रीवास्तव देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन राजू यांच्या तब्येतीबाबत माहिती देत होते. राजू श्रीवास्तव यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. राजू श्रीवास्तव यांना अनेक सेलिब्रीटी श्रद्धांजली वाहत आहेत.

हिंगोलीमध्ये शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

Exit mobile version