प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना आला हृदयविकाराचा झटका…

"राजू बरा होत आहे आणि आता तो धोक्याबाहेर आहे".

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव  यांना आला हृदयविकाराचा झटका…

राजू श्रीवास्तव

मुंबई: लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव (58) यांना बुधवारी सकाळी दिल्लीच्या जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या भावाने प्रसारमाध्यमांना याची पुष्टी केली आहे. रिपोर्ट्सनुसार, द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज फेम कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या छातीत दुखू लागले आणि ते ट्रेडमिलवर व्यायाम करत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली. त्यांना दिल्लीतील एआयआयएमएस (AIIMS hospital) या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आता, राजू श्रीवास्तव यांचे जवळचे मित्र आणि आणखी एक लोकप्रिय कॉमेडियन सुनील पाल यांनी राजूच्या तब्येतीची अपडेट शेअर केली आहे.द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या पहिल्या सीझनमध्ये राजू श्रीवास्तव यांचा पराभव करणाऱ्या सुनील पाल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “राजू बरा होत आहे आणि आता तो धोक्याबाहेर आहे”. तसेच सुनील पाल यांनी राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत म्हणून शुभेच्छाही दिल्या आणि ते म्हणाले कि राजू श्रीवास्तव अद्यापही दिल्‍लीमध्‍येच आहेत.सुनील पुढे म्हणाले कि, “राजू भाई लवकर बरे व्हा,आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो, तुच्यावरचा धोका टळला हि सर्वांसाठीच एक आनंदाची बाब आहे. आम्ही मुंबईत तुमची वाट पाहत आहोत.

राजू श्रीवास्तव हे फक्त कॉमेडीयनच नसून उत्तम अभिनेते देखील आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक प्रसिद्ध हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे, ज्यात मैने प्यार किया, मैं प्रेम की दिवानी हूं, बॉम्बे टू गोवा आणि बाजीगर यांचा समावेश आहे.

Exit mobile version