शिवाली परब चे ‘हे’ फोटोज पाहून चाहते थक्क

सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. शिवाली ही हास्य जत्रेच्या मंचावर अतिशय साध्या पोशाखात असते.

शिवाली परब चे ‘हे’ फोटोज पाहून चाहते थक्क

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिवाली परब, तिचा निरागस अंदाज सोडून सध्या एकदम हॉट अंदाजात दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. शिवाली ही हास्य जत्रेच्या मंचावर अतिशय साध्या पोशाखात असते. पण सध्या तिच्या हॉट फोटोंनी साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

शिवालीने नुकतेच एक नदी काठी फोटोशूट केले आहे. यात ती एरवीपेक्षा एकदम भन्नाट लूक मध्ये दिसत आहे. फोटोत शिवाली ने वेस्टर्न लूक केला असून तिने निसर्गरम्य ठिकाणी हॉट पोज देत फोटोशूट केलं आहे. अनेक चाहत्यांनी शिवालीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव केला आहे.

शिवालीच्या अनेक भूमिका व पात्रं हास्यजत्रेमुळे लोकप्रिय झाली आहेत. सोशल मीडियावर विविध प्रकारचे ड्रेस आणि साडी अशा दोन्ही प्रकारच्या पेहरावात ती सातत्याने फोटो पोस्ट करत असते. कॉलेजमध्ये असताना शिवालीने अनेक नाटकांसाठी पुरस्कार मिळवले आहेत. आता हास्यजत्रा आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून तिने तिचा हा प्रवास यशस्वीपणे सुरू ठेवला आहे.

Exit mobile version