‘फायटर’ चा बॉक्स ऑफिसवर डंका,प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा चित्रपटाला फायदा

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणचा फायटर हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला.

‘फायटर’ चा बॉक्स ऑफिसवर डंका,प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा चित्रपटाला फायदा

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणचा फायटर हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर झालेल्या हवाई हल्ल्यावर आधारित हा नवीन चित्रपट लोकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाला धक्का बसला. पाकिस्तान सैन्याला भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिल्याचे या सिनेमात दाखवण्यात आले आहे.या चित्रपटात ॲक्शनचा तडका पाहायला मिळाला आहे.दरम्यान देशभक्तीवर आधारित असलेले चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच भावतात.या चित्रपटातील आकाशात भिडणाऱ्या ॲक्शन सीन्सने चित्रपटगृहांमध्ये खळबळ उडवून दिली.

दरम्यान ‘फायटर’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.’फायटर’ या सिनेमाची देशभरात चांगलीच क्रेझ आहे. रिलीजआधीपासून चर्चेत असणारा हा सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने सिनेमागृहात गर्दी केली आहे. ‘फायटर’ने 2024 ची धमाकेदार सुरुवात केली आहे. आता प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचाही या सिनेमाला फायदा झाला आहे. ‘फायटर’ हा सिनेमा 25 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी फायटरने 22 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 39 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच दोन दिवसांत या सिनेमाने 61.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा ‘फायटर’ हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. वैमानिकाच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाला अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. ‘फायटर’ या सिनेमात दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानवर हवाई हल्ला करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्यावर आधारित या सिनेमाचं कथानक आहे.’फायटर’ या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. तर अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर आणि अक्षय ओबेरॉय हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.उत्तम कथानक आणि तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा आहे.

‘फायटर’ हा 2 तास 46 मिनिटांचा सिनेमा आहे. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने यू/ए सर्टिफिकेट दिलं आहे. देशभरात हा सिनेमा 7,537 स्क्रीनवर रिलीज झाला आहे. चित्रपट सुमारे २५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनल्याचे म्हटले जाते.हृतिक रोशनची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीचं पसंतीस उतरली आहे,तर दीपिकाचे चित्रपटातील कामाला देखील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.दरम्यान हृतिक रोशन आणि दीपिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीचं पसंतीस उतरली आहे.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणाची लढाई अखेर संपली, एका रात्री नेमकं काय झालं?

स्वातंत्र्याच्या अमृत काळात नवीनमहाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा – राज्यपाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version