spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Week end चा ‘फायटर’ चित्रपटाला फायदा,बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण त्यांच्या  'फायटर' या चित्रपटामुळे सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण त्यांच्या  ‘फायटर’ या चित्रपटामुळे सध्या चांगलेच चर्चेत आहेत.मागच्या आठवड्यात हा चित्रपट  सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.चित्रपटाचे टिझर आणि ट्रेलर पाहुन प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते.अखेर आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा दमदार कमाई करत आहे.

‘फायटर’ हा सिनेमा 25 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 22.5 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 39.5 कोटी, तिसऱ्या दिवशी 27.5 कोटी आणि चौथ्या दिवशी 28.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 118 कोटींचा गल्ला जमवला आहे.

गेल्या वर्षी २५ जानेवारीला सिद्धार्थ आनंदचा ‘पठाण’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. या चित्रपटात शाहरुख खान प्रमुख भूमिकेत होता. यावर्षी २५ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ‘फायटर’ रिलीज झाला, या सिनेमालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. ‘फायटर’ हा भारताचा पहिला एरियल अॅक्शनपट आहे. सिनेप्रेक्षकांच्या हा सिनेमा पसंतीस उतरला आहे.प्रजासत्ताक दिनाला धरुन पुढचे दोन दिवस म्हणजे शुक्रवार ,शनिवार,रविवार अशा तिन दिवसाच्या वीकेंडमुळे या चित्रपटाची चांदीच झाली.प्रेक्षक वर्गानी अक्षरशा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गर्दी केली होती.त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने  चांगलाच गल्ला जमवला आहे. देशभरात हा सिनेमा 4300 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.

‘फायटर’ या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. तसेच अनिल कपूर, करण सिंह ग्रोवरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.. ‘फायटर’ या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हृतिक-दीपिकाची जबरदस्त केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

यासोबतच या चित्रपटाने देशभरात १०० कोटींच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे. ‘फाइटर’ने एकूण ४ दिवसांत ११८.०० कोटींची कमाई केली आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर ‘फाइटर’ने जवळपास १८० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत १५० कोटींहून अधिक कमाई केली होती.दरम्यान आता हा चित्रपट या आठवड्यात कितीचा गल्ला जमवणार हे पाहणं औस्तुकत्तेचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणाचा कायदा झाला असून सर्व मराठा समाजाला त्याचा फायदा मिळणार आहे – मनोज जरांगे

अनेकदा वादाच्या कचाट्यात सापडला आहे ‘बिग बॉस १७’चा विजेता,जाणुन घेऊयात मुनव्वर फारुकीचा प्रवास…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss