‘या’ निर्मात्याच्या सल्ल्याने साइन केला चित्रपट, अनन्या पांडेचा खुलासा

‘या’ निर्मात्याच्या सल्ल्याने साइन केला चित्रपट, अनन्या पांडेचा खुलासा

अनन्या पांडे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपले पाऊल स्थापित करण्यासाठी सर्वतोपरी करत आहे. अलीकडेच तिचा विजय देवकोंडासोबतचा ‘लिगर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. सोशल मीडियावर अनेकांनी अनन्याच्या अभिनयावर टीका केली. काही लोकांनी तिला अभिनयाच्या क्लासमध्ये जाण्याचा सल्लाही दिला. या सगळ्यांमध्ये अनन्या पांडेंची एक मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये अनन्या कोणाच्या सांगण्यावरून कोणताही चित्रपट साइन करते हे तिने स्पष्ट केले.

हेही वाचा : 

यश, परी आणि नेहा घेणार का प्रेक्षकांचा निरोप ?

एक प्रसिद्ध मनोरंजक वाहिनीला मुलाखत देताना अनन्या पांडेने खुलासा केला की, चित्रपट निर्माता करण जोहर तिचा गुरु आहे. ज्याच्या सल्ल्याने ती चित्रपट निवडते नुकतीच अनन्या पांडे करण जोहरच्या प्रोडक्शन खाली बनलेल्या लिगर चित्रपटात दिसली होती. त्याचवेळी अनन्याने करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनन्याने ‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’या चित्रपटद्वारे इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले. अनन्या पांडेने निवडक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले. ती तिच्या चित्रपटांसाठी खूप मेहनत करते पण दुर्दैवाने तिचे मोजके चित्रपट हे आतापर्यंत हे ठरले आहे. लिगर चित्रपटापूर्वी ती घेहरिया या चित्रपटामध्ये दिसली होती. ज्यामध्ये दीपिका पदुकोण शिवाय सिद्धार्थ चतुर्वेदी हे महत्त्वाच्या भूमिकेत होते.

आता सध्या चंकी पांडेची कन्या अनन्य पांडे ही ड्रीम गर्ल टू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्मान खुराना दिसणार आहे. याशिवाय खो गये हम कहा हा देखील अनन्य पांडेचा आगामी चित्रपट काहीच दिवसात प्रदर्शित होणार आहे.

गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या घरी जाणे औपचारिकता की, मनपासाठी नवीन समीकरण?

Exit mobile version