spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रणबीर-आलियाला मिळाला फिल्मफेअर अवार्ड,नितू कपूर यांनी पोस्ट शेअर करत केलं अभिनंदन

काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये फिल्मफेअर पुरस्कार पार पडले. या पुरस्कार सोहळ्याला रणबीर कपूर आणि आलिया भट्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतले.

काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये फिल्मफेअर पुरस्कार पार पडले. या पुरस्कार सोहळ्याला रणबीर कपूर आणि आलिया भट्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतले. यावर्षी रणबीर कपूर आणि आलिया भट या दोघांनाही फिल्म फेअर अवार्ड मिळाला आहे.याचदरम्यान नीतू कपूर यांनी दोघांच ही सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केलं आहे. नीतू कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.वैयक्तिक  आयुष्याबाबतच्या अपडेट्स त्या सोशल मीडियावरुन शेअर करत असतात.. मुलगा आणि सून दोघांनाही फिल्मफेअर मिळाल्याने नीतू कपूर यांना प्रचंड आनंद झाला आहे. त्यांनी सोशल मीडियावर आलीया आणि रणबीरचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केलाय. शिवाय, दोघांचे अभिनंदनही केले आहे. 

अभिनेत्री नीतू कपूर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन रणबीर-आलीयाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन लिहिताना नीतू कपूर म्हणाल्या, “संजू आणि राणी या सिनेमांतील रणबीर आणि आलीयाचा उत्कृष्ट अभिनयासाठी 2019 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तेव्हा मी दोघांसाठी प्रार्थना करत होते. ‘अॅनिमल’ आणि ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ला अवार्ड मिळाला. त्याबद्दल तुमचे अभिनंदन. मला तुमचा अभिमान वाटतो.” अशी पोस्ट त्यांनी शेअर करत दोघांच कौतुक केलं आहे.

गुजरातच्या गांधीनगरमध्ये फिल्मफेअर अवार्ड्च्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला 27 जानेवारी 2024 ला सुरुवात झाली. दरम्यान, रविवारी या अवार्ड्चे सोहळा पार पडला. फिल्मफेअरमध्ये बेस्ट अभिनेत्याचा अवार्ड रणबीर कपूरला मिळाला आहे. त्याला अॅनिमल या सिनेमासाठी हा अवार्ड देण्यात आला. तर आलियाला ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ला या सिनेमासाठी अवार्ड देण्यात आला. 

दोघांनीही अवार्ड मिळाला असल्यामुळे दोघं ही प्रचंड खुश आहेत.तर याच दरम्यानया अवार्ड सोहळ्यातील रणबीर आणि आलियाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोघेही अॅनिमल या सिनेमातील जमाल कडू या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दोघांनीही बॉबी देओलप्रमाणे डोक्यावर ग्लास ठेऊन या गाण्यातील हुकस्टेपवर  डान्स केला आहे. आलिया आणि रणबीरच्या डान्सला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.आणि सगळीडून त्यांचे कौतुक देखील होत आहे.

हे ही वाचा:

छगन भुजबळ यांच्या भूमिकेला राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहमत नाही – बबनराव तायवाडे

सरकार गुन्हा दाखल करतो आणि देवेंद्र फडणवीस मात्र.. काय म्हणाले SANJAY RAUT

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss