अखेर तीन दशकांनंतर, काश्मीरमध्ये गुंजणार बॉलिवूडचा आवाज!

काश्मीरमधील (Kashmir) मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे. काश्मीर खोऱ्यातील नागरिकही आता बॉलिवूडचे चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहू शकणार आहेत.

अखेर तीन दशकांनंतर, काश्मीरमध्ये गुंजणार बॉलिवूडचा आवाज!

काश्मीरमधील (Kashmir) मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे. काश्मीर खोऱ्यातील नागरिकही आता बॉलिवूडचे चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहू शकणार आहेत. तब्बल तीस वर्षांनंतर येथे मल्टिप्लेक्सची सुरूवात झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यावर चित्रपट बघण्याची येथील नागरिकांची सुप्त इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी आज श्रीनगरमधील सोनमर्ग येथे पहिल्या मल्टिप्लेक्स सिनेमा हॉलचे उद्घाटन केले. आजपासून या मल्टिप्लेक्समध्ये आमिर खानचा स्टारर लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगने नागरिकांसाठी हे चित्रपटगृह खुले केले जाणार आहे. तर, ३० सप्टेंबरपासून येथे नियमित शो सुरू केले जाणार आहे.

काश्मीरच्या पहिल्या मल्टिप्लेक्समध्ये एकूण ५२० आसनक्षमतेचे तीन सिनेमागृह असणार आहेत. स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने परिसरात फूड कोर्टही असणार आहे. मल्टिप्लेक्सचे उद्घाटन करताना लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले की, या प्रसंगी मी दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचबरोबर विज्ञान जर शोध असेल तर, कला ही त्याची अभिव्यक्ती असल्याचे ते म्हणाले. ज्यांच्यावर जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी ते काम चुकीच्या पद्धतीने केले. मात्र, आता काळ बदलत आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) स्टारर ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसह मल्टिप्लेक्स आजपासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. ३० सप्टेंबरपासून हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) अभिनीत ‘विक्रम वेधा’च्या (Vikram Vedha) स्क्रीनिंगसह चित्रपटांचे नियमित शो सुरू होतील. काश्मीरच्या पहिल्या या मल्टिप्लेक्समध्ये एकूण ५२० आसनक्षमतेची तीन चित्रपटगृहे आहेत. स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने थिएटरच्या आवारात ‘फूड कोर्ट’ देखील असणार आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधीच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाला पक्षातीलच नेत्यांचा विरोध

दसरा मेळावा वादात आता राऊतांची उडी, दिला मोलाचा सल्ला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version