spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अखेर बिपाशा बासूने चाहत्यांना दिली गुड न्युज

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि कारण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) यांनी अखेर ते आई बाबा होणार असल्याची घोषणा केली आहे. गेले काही दिवस अभिनेत्री बिपाशा बासू हि गरोदर आल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत होत्या.

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि कारण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) यांनी अखेर ते आई बाबा होणार असल्याची घोषणा केली आहे. गेले काही दिवस अभिनेत्री बिपाशा बासू हि गरोदर आल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत होत्या. परंतु या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे आणि पूर्णपणे शिकामोर्तब हा झाला आहे. कारण स्वतः बिपाशा बासू हिने आपल्या सोशल मीडिया अकॉउंट वरून हि माहिती दिली आहे. (Bipasha Basu and Karan Singh Grover announce pregnancy)

बिपाशाने पती करण सोबत हे खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करत ग्लॅमरस फोटोशूट करत चाहत्यांना गोड बातमी दिली. या फोटोमध्ये बिपाशा गरोदर असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. तसेच तिचं बेबी बम्पही पाहायला मिळत आहे. बिपाशाने फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. बिपाशा आणि करण दोघांच्याही चेहऱ्यावर आईृ-बाबा होणार असल्याचा आनंद ओसंडून वाहत आहे. बिपाशा आणि करण यांनी दोघांनीही एक पोस्ट शेयर केली आहे, ज्यामध्ये आपल्या बेबी बंसह बिपाशा आणि करण एकत्र दिसत आहे. या फोटोमध्ये करण बिपाशाला घट्ट मिठी मारून उभा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

बिपाशा आणि करणची भेट २०१५ मध्ये ‘अलोन’ च्या सेटवर झाली. आणि इथेच दोघांमध्ये आधी मैत्री,त्यानंतर प्रेमाचं नातं फुललं. २०१६ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर सहा वर्षांनी बिपाशा आणि करणने आई बाबा होण्याचा निर्णय घेतला असून अखेर आज ही गोड बातमी दिली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बिपाशा म्हणाली, “नवी वेळ, नवी सुरुवात आणि नवा प्रकाश आमच्या आयुष्यामध्ये आला आहे. आम्ही दोघांनीच नव्या आयुष्याला सुरुवात केली आणि तेव्हापासून आम्ही फक्त दोघंच होतं. एकमेकांवरच फक्त खूप प्रेम करायचं हे थोडं अयोग्य वाटलं. म्हणून आता लवकरच आम्ही दोनाचे तीन होणार आहोत. लवकरच आमचं बाळ आमच्याबरोबर असेल आणि आमचा आनंद द्विगुणीत होईल.”

पुढे ती म्हणते, ‘तुम्ही आमच्यावर बिनशर्त प्रेम केल्याबद्दल, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद, त्या कायमच आमच्या सोबत असतील. आमच्या जीवनाचा एक भाग बनल्याबद्दल धन्यवाद.. लवकरच आमच्यासोबत एक जीव जोडला जाणार आहे ते म्हणजे आमचं बाळ.. दुर्गा दुर्गा’ तिच्या या शब्दांवरून बिपाशाला झालेला आनंद आपल्या लक्षात येतो.

बिपाशाने हे सुंदर फोटो शेअर करताच चाहत्यांसह कलाविश्वातील अनेक मंडळींनी या सेलिब्रिटी कपलला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. बिपाशा-करणने आपण आई-बाबा होणार हे जाहिर करताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद देखील दिसून येत आहे. शिवाय बिपाशाचा प्रेग्नेंसी ग्लो विशेष लक्षवेधी आहे. एकूणच काय तर बिपाशा-करणच्या आयुष्याची आता नवी सुरुवात झाली आहे.

हे ही वाचा :-

कृष्ण जन्माष्टमी विशेष, जाणून घ्या श्रीकृष्ण देवाची जन्मकथा

Latest Posts

Don't Miss