Gandhi Godse Ek Yudh सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट; नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

'गांधी-गोडसे एक युद्ध' (Gandhi Godse Ek Yudh) या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली आणि तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आहे.

Gandhi Godse Ek Yudh सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट; नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली आणि तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमाची घोषणा झाल्यानंतर या सिनेमात नथुराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका नक्की कोण साकरणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. सर्वांना उत्सुकता लागली होती कि नक्की कोणता अभिनेता हि भुमिका साकारणार आहे. परंतु आता या सिनेमात मराठमोळा अभिनेता चिन्यम मांडलेकर (Chinmay Mandlekar) नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. तब्बल ७ वर्षांनी राजकुमार संतोषी पुन्हा दिग्दर्शनात पुनरागमन करणार आहेत

अभिनेता चिन्मय मांडलेकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आजवर चिन्मय वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे तो चर्चेत असतो. आता ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या सिनेमात तो नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी शरद पोंक्षे यांनी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकात नथुराम गोडसेची भूमिका साकारली होती.

राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या सिनेमाच्या माध्यमातून ९ वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. राजकुमार यांनी ८० चं दशक चांगलच गाजवलं आहे. आता नऊ वर्षांनी एक नवा कोरा सिनेमा घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेच्या भूमिकेत तर महात्मा गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता दीपक अंतानी दिसणार आहेत. गांधी विरुद्ध गोडसे या विचारधारेमधील युद्धावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण, ऐश्वर्या राय आणि तुषार कपूर हे कलाकारदेखील झळकणार आहेत. याहून आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख आहे. ‘गांधी गोडसे’ हा चित्रपट पुढच्या वर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

शाहरुख खानचा आगामी ‘पठाण’ हा सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तर ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा सिनेमा २६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे आमने-सामने येणार आहेत. आता कोणता सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो याकडे निर्मात्यांचे लक्ष लागले आहे. दोन्ही चित्रपटांसाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. याआधीसुद्धा बॉक्स ऑफिसवर असे क्लॅश बऱ्याचदा अनुभवायला मिळाले आहेत, पण तेव्हा कोणत्या तरी निर्मात्याने प्रदर्शनाची तारीख बदलल्याचं आपण पाहिलं आहे. अजूनतरी राजकुमार संतोषी किंवा शाहरुख खान या दोघांकडून अशी कोणतीही बातमी समोर आली नसल्याने हे दोन चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकणार हे नक्की आहे. सध्या ‘पठाण’विरुद्ध चांगलाच रोष बघायला मिळत आहे. अशातच या दोन्ही चित्रपटांमध्ये क्लॅश होणार असेल तर नेमका कोणता चित्रपट बाजी मारून नेतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

हे ही वाचा:

Happy Birthday Salman Khan एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये घेणारा सलमान आजही १ बीएच फ्लॅटमध्ये राहतो?

Happy Birthday Salman Khan बॉलिवुडच्या दबंग स्टारने ५७ व्या वर्षी केक कट करत मानले चाहत्यांचे आभार

Salman khan – Aishwarya rai म्हणजे ९० च्या दशकातील लोकप्रिय जोडी, जाणून घ्या यांच्या ९० च्या दशकातील लोकप्रिय जोडी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version