spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: असे कलाकार ज्यांनी साकारली होती गणपती बाप्पाची भूमिका; ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर पाडली होती भुरळ

Ganeshotsav 2024: गणेश चतुर्थीच्या(Ganesh Chaturthi) हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. गणेश उत्सवात गणपती बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा केली जाते. हा काळ भक्तांसाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. गणेश उत्सवात सर्वजण एकत्र येतात आणि एकत्र येऊनच सण साजरा करतात. एकत्र येऊन सण साजरा केल्यामुळे यातून सर्वानाच आनंद मिळत असतो. अनेक विधी आणि पारंपरिक रिती एकत्रपणे पाळून देवाची सेवा केली जाते. अश्या काही मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या होत्या ज्यांना चाहत्यांनी भरपूर प्रेम दिलं.

आज आपण आहे कलाकार जाणून घेणारा आहोत ज्यांनी मराठी मालिकांच्या माध्यमातून गणपती बाप्पा हे पात्र साकारून सर्व प्रेक्षकांपर्यंत गणपती बाप्पाच्या कथा, कहाण्या मालिका प्रेमीपर्यंत पोहचवल्या.

१) ‘देवा श्री गणेशा’ (Deva Shri Ganesha):  या मराठी मालिकेत अद्वैत कुलकर्णी (Adwait Kulkarni) या कलाकाराने गणपती बाप्पाचं पात्र साकारलं होतं. ही मालिका फक्त ११ दिवस चालली होती. मालिकेला टीआरपी नसल्याने लगेचच ही मालिका बंद केली गेली.

२) ‘गणपती बाप्पा मोरया’ (Ganpati Bappa Morya): ही मराठी मालिका पार्वती देवी आणि त्यांचा पुत्र श्री गणेश यांच्या नात्यावर आधारित ही होती. या मालिकेत स्वराज येवले (Swaraj Yewale) या मराठी कलाकाराने बाप्पाची भूमिका साकारली होती. ही मराठी मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती आणि प्रेक्षकांनी खूप छान प्रतिसाद दिला होता.

३) ‘विघ्नहर्ता गणेश’ (Vighnaharta Bappa): ही मालिका सोनी टीव्ही वाहिनीवरील मालिका लोकप्रिय ठरली होती. यात अभिनेता उजैर बसर(Ujair Basar) आणि निष्कर्ष दीक्षित (Nishkarsh Dikshit) या दोन कलाकारांनी गणपती बाप्पाची भूमिका साकरली होती. एकूण १०२६ एपिसोड या मालिकेने यशस्वीपणे पूर्ण केले.

हे ही वाचा:

माझं डोकं फिरवू नका, तुमच्यात एवढी खुमखूमी असेल तर… राऊतांची Manoj Jarange Patil यांच्यावर जहरी टीका

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडमध्ये; ‘या’ चार नेत्यांवर सोपवली जाणार महत्त्वाची जबाबदारी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss