सर्वांच्या लाडक्या भाईजानवर गँगस्टरचा निशाण

सर्वांच्या लाडक्या भाईजानवर गँगस्टरचा निशाण

काही दिवसांपूर्वी पंजाबमधील दिग्ग्ज गायक सिद्धू मुसेवाला (sidhu moose wala) यांच्या हत्येनंतर बॉलीवूड दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan) चर्चेत आहे. सिद्धू मुसेवाला यांना ज्यांनी ठार मारलं त्याच्या निशाण्यावर आता सलमान खान आहे अशी चर्चा होऊ लागली. सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली. (Salman’s security increased)

काही दिवसांपूर्वी सलमान खान यांच्या मुंबईमधील राहत्या घरी एक धमकीची चिट्ठी सापडली होती. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत पोलिसांनी कडून सुरक्षा वाढवण्यात अली होती.

आज एक मोठी धोकादायक गोष्ट समोर अली आहे. मूसेवाला यांच्या हत्येप्रकरणातील एका शूटरनं हा खळबळजनक खुलासा केला आहे. सलमान गॅंगस्टर्सच्या निशाण्यावर होता, असा गौप्यस्फोट त्यानं केला आहे. पंजाबचे डीसीपी गौरव यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

iOS 16 रिलीझ: ॲपलच्या मोठ्या अपडेटबद्दल ‘या’ गोष्टी जाणून घेणे आहे गरजेचे

सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी शूटर कपिल पंडित हा अटकेत आहे. पोलिसांच्या चौकशी मध्ये सलमान खान गॅंगस्टर्सच्या निशाण्यावर होता,असं त्यानं सांगितलं आहे. बिश्नोई गँगनं त्याला सलमानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं , त्याचा पाठलाग करण्याच काम दिलं होतं. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घर बाहेर जीवे मारणेच्या धमकीचं पत्र बिश्नोईनं ठेवलं होतं त्यानंतर सलमान खानच्या अपार्टमेंट बाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षेत मुंबई पोलिसांनी वाढ केली होती.

हे ही वाचा:

बहुचर्चित ‘शिवप्रताप गरुडझेप’चा टीझर रिलीज

श्वेता तिवारी मुलीला लग्न करण्याचा का सल्ला देत नाही ?

ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करणे अन्यायकारक, ओबीसी एकीकरण समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version