गश्मीर महाजनी दिसणार नवीन भूमिकेत

रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) याला नेटकऱ्यांसह,सेब्रिटींनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर ट्रोल करायला सुरुवात केली.

गश्मीर महाजनी दिसणार नवीन भूमिकेत

रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) याला नेटकऱ्यांसह,सेब्रिटींनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर ट्रोल करायला सुरुवात केली. अभिनेता गश्मीर महाजनी याने त्याच्या अभिनयामुळे खूप लोकप्रियता मिळवली आहे. त्याचा अभिनय चाहत्यांना खूपच आवडतो. पण गेल्या काही वर्षपासून गश्मीर सिनेमापासून दूर होता. पण आता तो लवकरच पुन्हा एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. पण तो नक्की कोणता सिनेमा आहे हे अद्याप अजून समजले नाही आहे. याआधी गश्मीरने ऐतिहासिक भूमिकेमध्ये काम केले आहे. त्याने देऊळ बंद, सरसेनापती हंबीरराव, कान्हा या मराठी चित्रपटामध्ये काम केले आहेत.

गश्मीर महाजनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे . तो व्हिडिओ शेअर करत त्याने लिहलं आहे ‘ “पुन्हा एकदा तोच प्रवास…लवकरच..”.त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आजवर साकारलेल्या सर्व भूमिकांची झलक पाहायला मिळत आहे. चित्रपटातील सर्व फोटो त्याने कोलाज करून वापरले आहेत. त्यामुळे आता गश्मीर पुन्हा ऐतिहासिक भूमिकेत दिसणार का याची उत्सुकता सगळ्यांच लागली आहे.

गश्मीरने विडिओ शेअर केल्यानंतर नेटकाऱ्यानी अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यातील एका चाहत्यांनी विचारलं ,”आगामी सिनेमात संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेस का?त्यावर गश्मीर म्हणाला “अधिकृत घोषणेसाठी प्रतीक्षा करा…हा त्याकाळातील सिनेमा असला तरी आजवर तुम्ही कधीही न पाहिलेला अॅक्शनपट असेल. या सिनेमात अभिनयासह मी अॅक्शनदेखील करणार आहे”.आणखी एका चाहत्याला उत्तर देत गश्मीर म्हणाला “त्या काळातील साहसपट करत आहे..एवढचं खरं. योग्य वेळ आली की माहिती देईन”. याआधी गश्मीर याने प्रवीण तरडे यांच्या (Pravin Tarde) ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. पण आता तो पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत दिसेल का याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

Exit mobile version