मनीष मल्होत्राच्या पार्टीत गौरी खानचा बोल्ड लूक, तर अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती

मनीष मल्होत्राच्या पार्टीत गौरी खानचा बोल्ड लूक, तर अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती

मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) ​​हा एक भारतीय फॅशन डिझायनर, कॉस्च्युम स्टायलिस्ट, उद्योजक आणि चित्रपट निर्माता देखील आहे. काल डिझायनर मनीष मल्होत्राचा वाढदिवस होता. आणि त्याकरता त्याने एक भव्य पार्टी ठेवली होती. अनेक बॉलिवूड स्टार्सनी मनीषच्या या पार्टीला हजेरी लावली होती. आता मनीष मल्होत्राच्या पार्टीचे फोटो समोर आले आहेत. यावेळी बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी त्यांच्या मनमोहक आणि स्टायलिश अंदाजात दिसले. सर्व सेलिब्रिटींनी चाहत्यांची मने लुटली.त्याचबरोबर अनेक स्टार्सनी आपल्या स्टायलिश पेहरावाने चाहत्यांना वेड लावले आहे. गौरी खान (Gauri Khan) काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. तर, करीना कपूर (Kareena Kapoor), करिश्मा कपूर (Karisma Kapoor), मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अमृता अरोरा (Amrita Arora)देखील काळ्या रंगाचा ड्रेस मध्ये दिसले होते.

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने बॉलीवूडमधील सर्व कलाकारांना आममंत्रीत केल होते. पार्टीत करीना कपूर आणि तिच्या बरोबर असलेल्या मुलींच्या ग्रुपने एकत्र पोज दिली.मुलींनी साधा चेक शर्ट आणि काळी पँट घातली होती. त्याचवेळी करिश्मा कपूरही काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये उपस्थित झाली. करिश्माने काळ्या रंगाचा सूट आणि पॅन्ट घातली होती. मलायका अरोराने शॉर्ट व्हाईट टॉपसह उंच टाचांचे काळे बूट घातले होते. तिची बहीण अमृत अरोरा हिनेही कळा टॉप, काळी पॅन्ट आणि मॅचिंग ब्लेझर घातले होते. दोघेही खूप क्यूट दिसत होते.या पार्टीत अभिनेत्री सारा अली खानने पांढऱ्या क्रॉप टॉप आणि बेल बॉटमसह मॅचिंग जॅकेट घातलं होतं.तसेच अभिनेत्री नोरा फतेही ब्लॅक आणि बेज कलरच्या ड्रेसमध्ये पार्टीत उपस्थित होती. वरुण धवन पत्नी नताशासोबत पार्टीत पोहोचला होता. नताशाने निळ्या रंगाचा शायनिंग ड्रेस परिधान केला होता. या पार्टीत जान्हवी कपूरही उपस्थित होती. जान्हवी बरोबर तिची बहीण खुशी कपूरसुद्धा पोहोचली होती. जान्हवीने बॅकलेस ऑरेंज आउटफिट घातला होता.

या पार्टीत क्रिती सॅननने देखील फिट गुलाबी ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अशा प्रकारे अनेक बॉलीवूड कलाकारांनी मनीष मल्होत्राच्या पार्टीत अनोखा आणि चाहत्यांना मोहित करून टाकेल असा पेहराव केला होता.

हे ही वाचा : 

Mahaparinirvan Din महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर राज्यपाल कोश्यारी जनतेला संबोधित करताना म्हणाले

Datta Jayanti 2022 श्री दत्त जयंतीनिम्मित व्हाट्सअँपद्वारे द्या शुभेच्छा

Take care of your eyes in winter हिवाळयात डोळ्यांची काळजी अशी घ्यावी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version