spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

बॉलीवूडच्या No. १ जोडी मध्ये शाहरुख-गौरीच्या जोडीचं जोडीच नाव आवर्जून घेतलं जात. या रिअल लाईफ जोडीचे अनेक चाहते आहेत. शाहरुख खान आणि गौरी खान यांची जोडी ही आतापर्यंतची सक्सेकफूल (Successful )जोडी मानली जाते.

बॉलीवूडच्या No. १ जोडी मध्ये शाहरुख-गौरीच्या जोडीचं जोडीच नाव आवर्जून घेतलं जात. या रिअल लाईफ जोडीचे अनेक चाहते आहेत. शाहरुख खान आणि गौरी खान यांची जोडी ही आतापर्यंतची सक्सेकफूल (Successful )जोडी मानली जाते. गौरीची साथ ही शाहरुख खानला त्याच्या करियरच्या आधीपासूनच लाभली. गौरी आणि शाहरुख खान हे दिल्ली येथे भेटले. हे दोघे १९९१ साली विवाहबंधनात अडकले. गौरी ही फिल्म प्रोड्युसर(Film producer) आणि फॅशन डिझायनर (Fashion Designer) आहे. गौरी खान डिझाइन्स (Gauri khan designs ) नावाची तिची स्वतःची इंटेरिअर डिसायनिंग कंपनी देखील आहे.

सोमवारी मुंबईत गौरी खानच्या पहिल्या पुस्तकाचे लॉन्चिंग होते. यासाठी शाहरुख खान देखील तेथे उपस्थित होता. गौरी खान च्या या पुस्तकाचे नाव मे लाइफ इन डिझाईन आहे. शाहरुख खान यानेच हे पुस्तक लाँच केले. सत्य पुस्तकाचे प्रकाशन मुंबई पार पडले. या सोहळ्याला शाहरुख खान सोबतच त्याची तिन्ही मुले आर्यन खान, सुहाना खान, आणि अब्राम खान देखील आले होते.

शाहरुख खानच्या बायकोचे म्हणजेच गौरी खानचे पुस्तक लाँच करण्यासाठी खुद्द शाहरुख खान उपस्थित होता. या जोडीचे अनेक चाहते आहेत. गौरी खान ही तिच्या नवऱ्याच्या म्हणजेच शाहरुख खानच्या पाठी अगदी खंबीरपणे नेहमी उभी असते. प्रत्येक इव्हेंटला हे दोघे नेहमी एकत्र उपस्थित राहतात. तसेच गौरी च्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशनही शाहरुख खान आणि गौरी खान या दोघांनी मिळून केले. या इव्हेन्टच्या वेळी दोघांनी काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता आणि खास करून गौरीच्या पुस्तकाची प्रस्तावना हि तिच्या नवऱ्याने लिहिली आहे. शाहरुख खान याबद्दल सांगताना म्हणाला,” मी, माझा मुलगा, माझी मुलगी आणि माझी बहीण यांच्या तुलनेत गौरी ही आता खऱ्या अर्थाने घरातली सर्वात जास्त बिझी असणारी व्यक्ती आहे”.

गौरी खानच्या मे लाईफ इन डिझायनिंग या पुस्तकात अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींसाठी केलेल्या डिझाइन्सचे फोटोज आहेत. गौरी ही इंटेरिअर डिझायनर आहे. तिने अनेक सेलेब्रिटींसाठी डिझाइन्स बनवले आहेत. गौरीचे हे पुस्तक इंटेरिअर डिझायनर या क्षेत्रात काम करणाऱ्या व ज्यांना या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे अश्या लोकांनी वाचणे आवश्यक आहे. या पुस्तकांमधून त्यांना भरपूर माहिती मिळू शकते. शाहरुख खानने या पुस्तकाबद्दल बोलताना गौरीचे कौतुकही केलं आहे.

हे ही वाचा : 

दुपारची झोप येतेय? हे उपाय नक्की ट्राय करा | Tired | Lifestyle | Power Nap

Amazon India ने तब्बल ५०० कर्मचाऱ्यांना काढले कामावरून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss