Taali चित्रपट पहिल्यानंतर गौरी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर…

गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ताली (Taali) ही वेब सिरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे.

Taali चित्रपट पहिल्यानंतर गौरी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर…

गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ताली (Taali) ही वेब सिरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. अभिनेत्री सुश्मिता सेन या वेब सीरिजमध्ये काम करतांना आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेल्या ताली या बहुचर्चित वेब सिरीजचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. हि वेब सिरीज पहिल्यानंतर गौरी सावंत यांनी त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

गौरी सावंत यांनी ताली हि सिरीज पहिल्यानंतर त्यांच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. आणि त्या म्हणाल्या ” आपली टाळी जेव्हा जोरात वाजते, तेव्हा कधी कधी आपणच दचकतो, जसं आपली जीभ आपल्या दाता खाली येते तेव्हा. आज बायोपिक बघताना हेच होत माझा मनात, ठिबक सिंचन डोळ्यातून चालू होते”.

त्यानी पुढे लिहिलं होत “तृतीयपंथांचा पालकांना काय वाटत असेल होणारी घुसमट त्रास याला न्याय दिला आहे सुश्मिताने…. क्षितिजने काय लिहलय रे बाबा रवी जाधव यांनी खूप छान दिग्दर्शन केले आहे. माझ्या संपूर्ण टीम कडून मी तुमचे आभार मानते सरळ सोप्या पद्धतीने माझं आयुष्य दाखवल्या बदल अफीफा नाडियादवाला हिने मला नव्याने जगासमोर आणल. कार्तिक व अर्जुन यांचे आभार”. असे गौरी सावंत म्हणाल्या.

गौरी सावंत यांचा पोस्ट वर क्षितिज पटवर्धन म्हणाले ” आमच्यासाठी सगळ्यात मोठी पावती आहे ही ” अशी कॉमेंट त्यानी केली आहे. तर दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले ” ज्यांचा आयुष्यावर आपण चित्रपट करतो त्याचा कडून आपले कोतुक कारण्यासारखं दुसरा आनंद नाही. धन्यवाद गौरी सावंत आमच्यासाठी हे खूप मोठे कौतुक आहे”. त्याचा या सिरीज चे चाहत्त्यांकडून कोतुक होत आहे. सुश्मिता सेन हिने तिचा दर्जेदार अभिनयामुळे प्रेक्षकांची माने जिंकली आहे. ताली या सिरीज मधून रवी जाधव यांनी गौरी सावंत याचा संघर्षमय जीवनच्या प्रवासाचे वर्णन यात केले आहे. गौरी सावंत यांचा हा खडतर प्रवास पाहून अनेकांनी त्याचे कोतुक केले आहे. ताली हि वेब सिरीज आल्याला जिओ सिनेमावर पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा:

Taali Web Series, सुष्मिताला सलाम! आज या ओटीटी वर रिलीझ…

Har Ghar Tiranga मोहिमेच्या नावावर सुपरहिट रेकॉर्ड, ८.८ कोटी लोकांनी अपलोड केले सेल्फी

Ola सुपरहिट धमाका! ५ इलेक्ट्रिक स्कूटर एकत्र लॉन्च, जाणून घ्या सविस्तर…

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version